शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

साथीदारांसाठी 'किंग ऑफ मर्डर'; एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:03 IST

दरोडा प्रकरणी एन्काउंटर झालेल्या अमोलच्या बहिणीला देखील अटक, आतापर्यंत २१ आरोपींना अटक

छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकर याचा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एन्काउंटर केला. आता त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात अमोल पिस्तुल स्वच्छ करताना आणि गुन्हेगारी गर्वाने बोलताना दिसत आहे. व्हिडीओत त्याचे साथीदार त्याला “मर्डर किंग”, "किंग ऑफ मर्डर" म्हणून संबोधतात, तर बंदुका हातात घेऊन तो म्हणतो, “गोळ्यांची किंमत साधी नाही. एक सुपारी एक कोटी रुपये. समोरचा माणूस १०० टक्के संपतो, ही खात्री आहे." अशा वल्गना करत असल्याचे दिसते. हा व्हिडीओ अमोलच्या गुन्हेगारी वृत्तीचा स्पष्ट पुरावा मानला जात असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

१४ मेच्या मध्यरात्री वाळूज एमआयडीसी परिसरात संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर सहा दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला होता. ५.५ किलो सोनं, ३२ किलो चांदी आणि ७० हजार रुपये असा ऐवज त्यांनी लंपास केला होता. ही घटना पोलिस ठाण्यापासून केवळ १ किलोमीटर अंतरावर घडल्याने सुरुवातीला खळबळ उडाली होती. या दरोड्याचा कट रचणारा लड्डांचा बालमित्र बालासाहेब इंगोले असून, त्याने अमोल खोतकर, योगेश हाजबे व इतर सहकाऱ्यांसह दरोड्याचे नियोजन केल्याचे समोर आले. इंगोले व इतर काही आरोपींना पोलिसांनी अटक केली, मात्र अमोल फरार राहिला.

एन्काउंटर आणि साक्षीदाराचा जबाब२६ मेच्या मध्यरात्री पोलिसांनी वडगाव कोल्हाटी ते सांजापूर रोडवरील एका हॉटेलजवळ अमोल खोतकरचा शोध घेत सापळा रचला. पोलिसांना पाहताच अमोलने गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलिसांवर गोळी झाडली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जागीच ठार झाला. घटनास्थळी अमोलसोबत त्याची मैत्रीण खुशी उर्फ हाफिजा शेख हिची उपस्थिती होती. तिने दिलेल्या कलम १६४ अंतर्गत न्यायालयीन जबाबात "अमोलनेच पोलिसांवर पहिली गोळी झाडली" असल्याचे सांगितले. तिचा जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरतोय. 

एकंदर गुन्हेगारी कारकिर्दअमोल खोतकरने केवळ दरोडेच नाही, तर इतर गंभीर गुन्ह्यांतही सहभाग असल्याचा संशय आहे. ‘एक कोटीत गेम करतो’ असे म्हणणारा हा गुन्हेगार शेवटी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झाला असला, तरी त्याचा व्हायरल व्हिडीओ, आणि मित्रमैत्रिणींचे जबाब अनेक प्रश्न उभे करत आहेत.

एन्काउंटर झालेल्या अमोलच्या बहिणीला अटकउद्योजक संतोष लड्डा यांच्या बजाजनगर येथील बंगल्यातील दरोडा प्रकरणात मुख्य आरोपी तथा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या अमोल खोतकरची बहिणी रोहिणी बाबूराव खोतकर (वय ३५, रा. आर्च आंगण, पडेगाव) हिस २३ जूनच्या रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी घरातील तुळशी वृंदावनाच्या खाली जमिनीत हातमोजामध्ये लपवून ठेवलेले २२ तोळे सोन्याचे दागिने आणि ७ जिवंत काडतुसे जप्त केली. दरोडा प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत २१ आरोपींना अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRobberyचोरी