शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील योद्धे स्वातंत्र्यसेनानी काशीनाथ नावंदर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 14:20 IST

स्वातंत्र्यानंतर राजकारण आणि विधी क्षेत्रात सक्रीय राहिले. 

औरंगाबाद: हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील निजाम सरकार आणि रझाकारांच्या विरोधात सशत्र लढ्यात सहभागी असलेले स्वातंत्र्यसैनिक जेष्ठ विधिज्ञ काशीनाथ नावंदर यांचे आज निधन झाले. वयाच्या ९५ वर्षी वृद्धापकाळाने शहरातील पदमपुरा येथील निवास्थानी त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. 

स्वातंत्र्यसैनिक काशीनाथ नावंदर स्टेट काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांनी भूमिगत राहून औरंगाबाद तहसील कचेरीवर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता. परसोडा आणि रोटेगावचे रेल्वे रूळ त्यांच्या गटाने उखडले होते. तारा तोडून निजाम सरकारची दळणवळण व्यवस्था त्यांनी आपल्या परीनं उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. सिद्धार्थ उद्यानाजवळचा पूल स्फोटानं उडवून छावणीचा शहराशी संपर्क तोडण्याचेही प्रयत्न त्यांनी केले होते.

काशिनाथ नावंदर यांचा अल्पपरिचय २७-१०-१९२७ रोजी झाला. प्राथमिक शिक्षण गंगापूर व नंतरचे औरंगाबाद येथे 'झाले. उस्मानिया विद्यापीठातून ते बी.एस्सी. एलएल. बी. पास झाले. १९५४ पासून औरंगाबाद येथे त्यांनी वकिली व्यवसाय सुरु केला. १९८१ पासून हायकोर्ट प्रॅक्टिस सुरू केली. १९४६ पासून त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घ्यायला सुरुवात केली. 

हैदराबाद मुक्तिलढ्यात सशस्त्र सहभागमहाराष्ट्र परिषद, समर्थ व्यायामशाळा, गणेश संघ अशा संस्थांमधून त्यांनी राजकीय जागृतीचे कार्य केले. राष्ट्र सेवा दलाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. ४७-४८ च्या हैदराबाद मुक्तिलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या भूमिगत लढ्यासाठी औरंगाबाद शहरात केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले होते. विद्यार्थी आणि तरुणांसाठी लढ्याचे शिक्षण देणारे कॅम्प त्यांनी उभे केले. शाळा, कॉलेज, कोर्ट यांच्यावर बहिष्कार टाकण्याच्या चळवळी त्यांनी उभ्या केल्या. सरकारी इमारती, रस्ते, पूल उडविणे, पत्रके काढून निज़ामविरोधी वातावरण तयार करण्यात सक्रिय होते. सरकारी यंत्रणा उलथवून टाकण्यासाठी मनमाड या मुख्य सीमोषेवर भूमिगत चळवळी केल्या. 

स्वातंत्र्यानंतर राजकारणात सक्रीय स्वातंत्र्य मिळाल्यावरही ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहिले. हैदराबाद संस्थान भारतात विलीनीकरणाच्या पोलिस अॅक्शननंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. नंतर प्रजासमाजवादी पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष, जनता पार्टी, जनता दल असा राजकीय प्रवास अनेक पदांवर राहून केला. १९८० साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसच्या विरोधात त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. आय काँग्रेसनं अब्दुल अजीम यांना तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत जनता दल आणि जनसंघातील युतीची बोलणी फिस्कटली. नावंदर यांचा पराभव करून अब्दुल अजीम आमदार झाले. त्यांनी मराठवाड्याच्या अनेक प्रश्नांवर उग्र लढे दिले. संयुक्त महाराष्ट्र समितीत अमूल्य योगदान दिले. औरंगाबाद शहरात बाहेरून आलेल्या निराधार लोकांसाठी झोपडी संघाची स्थापना केली. दक्षता समिती, लायन्स क्लब, तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ सिनेट या माध्यमातून कार्य केले. लायन्स क्लबद्वारा अनाथ बालकांसाठी बालग्रामाची स्थापना केली. मराठवाडा विकास ब्रॉडगेज रेल्वे यासाठी वेळोवेळी सत्याग्रह केले.

जेष्ठ विधिज्ञ म्हणून महत्वपूर्ण कामजनसंघानं मदत न केल्यामुळे पराभव स्वीकारावा लागल्याचा सल अखेरपर्यंत त्यांच्या मनात राहिली. त्यानंतर त्यांनी राजकारणाऐवजी वकिलीतच जम बसवला. बार असोसिएशनचे अध्यक्ष असताना मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबादला सुरू व्हावं, यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही त्यांनी भेट घेतली होती. गेल्या काही वर्षांपासून वृद्धापकाळामुळे ते सामाजिक जीवनात सक्रीय नव्हते. त्यांच्यावर आज बुधवारी सायंकाळी 5 वाजता प्रकाशनगर येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मनीष नावंदर यांनी दिली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू