शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मोफत टँकर : पाणी मनपाचे, नाव नेत्यांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 13:27 IST

सावेंचे टँकर अंजली कॉम्प्लेक्समध्येच ओततात पाणी

ठळक मुद्देदेवगिरी बँकेलाही मोफत पाणी

औरंगाबाद : सिडको एन-५ येथील जलकुंभावरून आ. अतुल सावे यांचे टँकर दररोज ६ हजार लिटर पाणी मोफत नेत आहे. मनपाने या पाण्याला शुल्क आकारले तर दरवर्षी १ लाख रुपये सावे यांना भरावे लागतील. सावे यांचा टँकरचालक गरजूंना पाणी देत नाही. भाजपशी संबंधित मोठ्या नागरिकांना, अंजली कॉम्प्लेक्स आदी भागात टँकर रिकामे करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. टँकरचालकाच्या रजिस्टरमधील नागरिकांची यादी बघितली, तर ती थक्क करणारी आहे. आमदारापाठोपाठ काही सेना-भाजप युतीच्या नगरसेवकांनीही मोफत टँकरचा फंडा सुरू केला आहे.

शहरात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज एन-५, एन-७ येथील जलकुंभांवर संतप्त नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. अनेक वॉर्डांमध्ये सातव्या, आठव्या दिवशी पाणी येत आहे. पाण्यासाठी नागरिक त्रस्त झालेले असताना एन-५, कोटला कॉलनी येथील जलकुंभावरून राजरोसपणे मोफत टँकर भरणे सुरू आहे. आ. अतुल सावे यांनी २०१४ पासून दोन हजार लिटरचे टँकर सुरू केले आहे. हे टँकर बाराही महिने एन-५ येथील टाकीवरून दररोज तीन ते चार वेळेस पाणी नेत आहे. टँकरचालकाकडील रजिस्टर बघितले, तर एकाही गरजू, सर्वसामान्य नागरिकाला टँकरद्वारे पाणी देण्यात आलेले नाही. भाजपशी निगडित असलेल्या मोठमोठ्या व्यक्तींना पाणी देण्यात येत आहे. काहींना तर दररोज एक टँकर पाणी दिले जात आहे. अंजली कॉम्प्लेक्स येथे दिवसातून चार ते पाच फेऱ्या केल्याचा उल्लेख आहे. 

एक हजार लिटर पाण्यासाठी मनपा ९० रुपये आकारते. सावे यांचे टँकर दोन हजार लिटरचे आहे. दिवसभरातून टँकरचालकाने चार फेऱ्या जरी केल्यास रोजचे ७२० रुपये होतात. या हिशोबाने महिना २१ हजार ६०० रुपये होतात, तर वर्षाला २ लाख ५९ हजार २०० रुपये होतात. मागील चार वर्षांपासून हे टँकर सुरू आहे. महापालिकेचे अत्यंत महागडे पाणी घेऊन मोफत सेवेचे बिंग फुटले आहे. नगरसेवक प्रमोद राठोड यांचेही टँकर मोफतच्या नावावर सुरू असल्याचे एन-५ पाण्याच्या टाकीवरील सूत्रांनी सांगितले. राजाबाजार वॉर्डाच्या नगरसेविका यशश्री बाखरिया यांनीही कोटला कॉलनीतून एक छोटा टँकर सुरू केला आहे. या टँकरची त्यांनी परवानगी घेतली असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

राजकीय नेत्यांनी टँकर आम्हाला द्यावेतराजकीय मंडळींना मोफत टँकर सेवा सुरू करण्याची एवढी हौस असेल, तर त्यांनी चालकासह टँकर मनपाकडे सुपूर्द करावा. आम्ही त्यामध्ये डिझेल टाकून राजकीय मंडळी सांगतील त्या वॉर्डामध्ये पाणी देऊ. मनपाकडे अ‍ॅडव्हान्स पैसे भरलेल्या नागरिकांना टँकर वेळेवर मिळत नाही. मोफत टँकरचालकांना पाणी कसे काय मिळते, असा प्रश्नही संतप्त नागरिक एन-५ पाण्याच्या टाकीवर येऊन विचारीत आहेत.

कुणाचे मोफत टँकरआ. अतुल सावे, भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोङ, शिवसेना नगरसेविका यशस्वी बाखरिया या नेतेमंडळींचे टँकर दररोज किती खेपा टाकतात आणि कुणाच्या घरी हे टँकर नेले जातात, यावर महापालिकेचे कोणतेच नियंत्रण नाही. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका