मिसाळवाडीत ‘फ्री स्टाईल’; दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद

By Admin | Updated: January 3, 2017 23:15 IST2017-01-03T23:13:43+5:302017-01-03T23:15:22+5:30

पाटोदा : जुन्या भांडणावरुन शेतकरी कुटुंबांतील दोन गट समोरासमोर आल्याने मिसाळवाडीत सोमवारी तुंबळ हाणामारी झाली.

'Free Style' in Missalwadi; Trial against 10 people | मिसाळवाडीत ‘फ्री स्टाईल’; दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद

मिसाळवाडीत ‘फ्री स्टाईल’; दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद

पाटोदा : जुन्या भांडणावरुन शेतकरी कुटुंबांतील दोन गट समोरासमोर आल्याने मिसाळवाडीत सोमवारी तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन १० जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
मिसाळवाडी येथील बबन सोपान मिसाळ व श्रीधर तात्याबा मिसाळ यांच्यात जुनी भांडणे होती. सोमवारी या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. गावातील मारोती मंदिरासमोर झालेल्या या हाणामारीत काठ्या- दगडांचा यावेळी सर्रास वापर करण्यात आला.
बबन मिसाळ यांच्या फिर्यादीवरुन रामदास मिसाळ, मधुकर मिसाळ, सतीश मिसाळ, गहिनीनाथ मिसाळ, श्रीधर मिसाळ, बाळू मिसाळ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला तर श्रीधर मिसाळ यांच्या तक्रारीनंतर सोपान मिसाळ, बबन मिसाळ, नामदेव मिसाळ, आप्पा मिसाळ यांच्याविरुद्ध अंमळनेर ठाण्यात फिर्याद नोंद झाली.
यामध्ये पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तपास फौजदार ए. टी. फुलेवाड हे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: 'Free Style' in Missalwadi; Trial against 10 people