शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेखापरिक्षणाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: December 18, 2014 00:38 IST

बीड : जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी कुठल्याही क्षणी विशेष लेखा विभागाची समिती धडकू शकते़

बीड : जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी कुठल्याही क्षणी विशेष लेखा विभागाची समिती धडकू शकते़ कारण सीईओ नामदेव ननावरे यांनी मागणी केलेल्या विशेष लेखापरिक्षणाला लेखा विभागानेच परवानगी दिली आहे़ त्यामुळे ‘दूध का दूध और पानी का पानी’ होणार असून घोटाळेबाजांच्या अक्षरश: झोपा उडाल्या आहेत़जिल्हा परिषदेतील नियमबाह्य कामांमुळे तक्रारींमागून तक्रारी झाल्या़ त्यानंतर चौकशी समित्यांनी झाडाझडती घेऊन अहवालही दिला;पण पुढे कारवाई झालीच नाही़ भाजपा सदस्यांनी तेराव्या वित्त आयोगासह, झेडपीआर व इतर कामांतील अनियमिततेविरुद्ध आंदोलन केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष समितीने चौकशी केली़ यामध्ये अनेक गंभीर बाबी समोर आल्या होत्या़ तरतूदीपेक्षा अतिरिक्त कामांना प्रशासकीय मान्यता, नियमबाह्य कामांची देयके अदा करणे यामुळे वित्तीय अनियमितता झाल्याचा ठपका समितीने ठेवला होता़ त्यानंतर सीईओ नामदेव ननावरे यांनी कॅफो वसंत जाधवर यांना एकतर्फी कार्यमुक्त करुन जोरदार हादरा दिला होता़ पाठोपाठ त्यांनी विशेष लेखा परिक्षणाची मागणीही केली होती़ त्याला अखेर बुधवारी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे़ लेखा विभागाच्या सहसंचालकांनी जि़प़ सह बीड येथील सहायक संचालक लेखा यांना पत्र पाठवून विशेष लेखा परिक्षण केले जाणार असल्याचे कळविले आहे़ त्यानुसार लेखा विभागाचे मुंबई येथील संचालक वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमणार आहेत़ या समितीमार्फत आता चौकशी होणार आहे़ यासंदर्भात सीईओ नामदेव ननावरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी विशेष लेखापरिक्षणास मंजुरी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे़जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीला केले होते असहकार्यजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या समितीने जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागाची झाडाझडती घेतली होती़ यावेळी तेराव्या वित्त आयोगाच्या प्रशासकीय मान्यता, ६७ लाखांची नियमबाह्य संगणक खरेदी संदर्भातील दस्तऐवज समितीपुढे ठेवले नव्हते़ त्यामुळे समितीला चौकशीतही अडथळे आले़ आता लेखा परीक्षणात प्रत्येक कागद समोर ठेवावा लागणार आहे़ लेखा विभागातील अधिकारी विशेष लेखा परिक्षणाला कसे सामोरे जातात ? हे पाहणे रोमांचक ठरणार आहे़ (प्रतिनिधी)४बांधकाम १ व २ या विभागांमध्ये तरतूदीपेक्षा जास्तीच्या प्रशासकीय मान्यता दिल्या़ शिवाय देयकेही अदा केली़ जिल्हा निधी व इतर विभागांचा निधीही देयकांसाठी वापरला़ १३ व्या वित्त आयोगासह झेडपीआरमधील वित्तीय नियम पाळले नाहीत, अशी अनियमितता यापूर्वी समोर आली होती़४विशेष लेखा परिक्षणात अतिशय सखोल चौकशी होते, त्यामुळे या चौकशीच्या ससेमिऱ्याची घोटाळेबाजांनी धास्ती घेतली आहे़ काहींनी समितीत कोण येणार? समिती कधी येणार? याची माहिती काढणे सुरु केले आहे़ या चौकशीकडे सर्वांच्या नजरा वेधल्या आहेत़