विशेष लेखापरिक्षणाचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: December 18, 2014 00:38 IST2014-12-18T00:06:47+5:302014-12-18T00:38:43+5:30
बीड : जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी कुठल्याही क्षणी विशेष लेखा विभागाची समिती धडकू शकते़

विशेष लेखापरिक्षणाचा मार्ग मोकळा
बीड : जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी कुठल्याही क्षणी विशेष लेखा विभागाची समिती धडकू शकते़ कारण सीईओ नामदेव ननावरे यांनी मागणी केलेल्या विशेष लेखापरिक्षणाला लेखा विभागानेच परवानगी दिली आहे़ त्यामुळे ‘दूध का दूध और पानी का पानी’ होणार असून घोटाळेबाजांच्या अक्षरश: झोपा उडाल्या आहेत़
जिल्हा परिषदेतील नियमबाह्य कामांमुळे तक्रारींमागून तक्रारी झाल्या़ त्यानंतर चौकशी समित्यांनी झाडाझडती घेऊन अहवालही दिला;पण पुढे कारवाई झालीच नाही़ भाजपा सदस्यांनी तेराव्या वित्त आयोगासह, झेडपीआर व इतर कामांतील अनियमिततेविरुद्ध आंदोलन केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष समितीने चौकशी केली़ यामध्ये अनेक गंभीर बाबी समोर आल्या होत्या़ तरतूदीपेक्षा अतिरिक्त कामांना प्रशासकीय मान्यता, नियमबाह्य कामांची देयके अदा करणे यामुळे वित्तीय अनियमितता झाल्याचा ठपका समितीने ठेवला होता़ त्यानंतर सीईओ नामदेव ननावरे यांनी कॅफो वसंत जाधवर यांना एकतर्फी कार्यमुक्त करुन जोरदार हादरा दिला होता़ पाठोपाठ त्यांनी विशेष लेखा परिक्षणाची मागणीही केली होती़ त्याला अखेर बुधवारी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे़ लेखा विभागाच्या सहसंचालकांनी जि़प़ सह बीड येथील सहायक संचालक लेखा यांना पत्र पाठवून विशेष लेखा परिक्षण केले जाणार असल्याचे कळविले आहे़ त्यानुसार लेखा विभागाचे मुंबई येथील संचालक वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमणार आहेत़ या समितीमार्फत आता चौकशी होणार आहे़
यासंदर्भात सीईओ नामदेव ननावरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी विशेष लेखापरिक्षणास मंजुरी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे़
जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीला केले होते असहकार्य
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या समितीने जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागाची झाडाझडती घेतली होती़ यावेळी तेराव्या वित्त आयोगाच्या प्रशासकीय मान्यता, ६७ लाखांची नियमबाह्य संगणक खरेदी संदर्भातील दस्तऐवज समितीपुढे ठेवले नव्हते़ त्यामुळे समितीला चौकशीतही अडथळे आले़ आता लेखा परीक्षणात प्रत्येक कागद समोर ठेवावा लागणार आहे़ लेखा विभागातील अधिकारी विशेष लेखा परिक्षणाला कसे सामोरे जातात ? हे पाहणे रोमांचक ठरणार आहे़ (प्रतिनिधी)४
बांधकाम १ व २ या विभागांमध्ये तरतूदीपेक्षा जास्तीच्या प्रशासकीय मान्यता दिल्या़ शिवाय देयकेही अदा केली़ जिल्हा निधी व इतर विभागांचा निधीही देयकांसाठी वापरला़ १३ व्या वित्त आयोगासह झेडपीआरमधील वित्तीय नियम पाळले नाहीत, अशी अनियमितता यापूर्वी समोर आली होती़४
विशेष लेखा परिक्षणात अतिशय सखोल चौकशी होते, त्यामुळे या चौकशीच्या ससेमिऱ्याची घोटाळेबाजांनी धास्ती घेतली आहे़ काहींनी समितीत कोण येणार? समिती कधी येणार? याची माहिती काढणे सुरु केले आहे़ या चौकशीकडे सर्वांच्या नजरा वेधल्या आहेत़