थायरॉईड आजारावर मोफत मार्गदर्शन

By Admin | Updated: May 27, 2014 00:57 IST2014-05-27T00:31:26+5:302014-05-27T00:57:19+5:30

लातूर : लोकमत व शेळके हॉस्पिटल थायरॉईड केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक थायरॉईड दिनानिमित्त २७ मे रोजी सायंकाळी ४ ते ६ यावेळेत मोफत मार्गदर्शन शिबीर होणार आहे.

Free guidance on thyroid disease | थायरॉईड आजारावर मोफत मार्गदर्शन

थायरॉईड आजारावर मोफत मार्गदर्शन

 लातूर : लोकमत व शेळके हॉस्पिटल थायरॉईड केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक थायरॉईड दिनानिमित्त २७ मे रोजी सायंकाळी ४ ते ६ यावेळेत मोफत मार्गदर्शन शिबीर होणार आहे. शिबीरात डॉ़ संजय शेळके यांचे मार्गदर्शन होणार आहे़ लोकमत सखीमंच, बालविकास मंच, युवा नेक्स्ट सदस्यांसह इतरांसाठीही मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजिण्यात आले आहे़ शिबीरात डॉ़ पी़बीक़ुलकर्णी, डॉ़ सुधीर फत्तेपुरकर, डॉ़ शाम पाटील, डॉ़ केंद्रे, डॉ़ आऱजी़सोमवंशी, डॉ़ नागमोडे, डॉ़ तळीखेडकर, डॉ़ कानडे, डॉ़राजेश पाटील, डॉ़ उटीकर आदी तज्ञांचे मार्गर्शन होणार आहे़ज्या रूग्णांना थायरॉईड आजाराची गोळी सुरू आहे किंवा ज्यांची थायरॉईड ग्रंथी काढून टाकली आहे, पण तरीही त्रास आहे अशा रूग्णांसाठी शिबीर उपयुक्त आहे़ शिबीरास सखीमंच, बालविकास मंच, युवा नेक्स्ट सदस्यांसह इतर नागरिकांनीही उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे़

Web Title: Free guidance on thyroid disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.