शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

मोफत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू !

By admin | Published: February 05, 2017 11:29 PM

उस्मानाबाद : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांनाही प्रतिथयश इंग्रजी शाळांमध्ये शिकता यावे, यासाठी मोफत २५ टक्के प्रवेश दिले जातात.

उस्मानाबाद : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांनाही प्रतिथयश इंग्रजी शाळांमध्ये शिकता यावे, यासाठी मोफत २५ टक्के प्रवेश दिले जातात. या प्रक्रियेला ५ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. प्रवेश अर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे.पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढू लागला असून त्याच प्रमाणात इंग्रजी शाळांची संख्याही वाढू लागली आहे. आर्थिक कुवत असणारे पालक आपल्या पाल्यांना अशा शाळांमध्ये दाखल करीत आहेत. परंतु, आर्थिक परिस्थिती बेताची असलेले पालक आपल्या पाल्यांना इच्छा असूनही अशा शाळांमध्ये दाखल करू शकत नाहीत. हाच प्रश्न लक्षात घेवून शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील बालकांसाठी अशा शाळांमध्ये मोफत २५ टक्के प्रवेश देण्यासाठीची योजना हाती घेतली. या प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी प्रवेशअर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. १६ जानेवारीपासून शाळांची नोंदणी सुरू होवून ही प्रक्रिया १९ दिवस चालली. यानंतर लागलीच ५ फेब्रुवारीपासून प्रत्यख प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दाखल होणाऱ्या अर्जातून सोडतीद्वारे विद्यार्थ्यांच्या शाळा निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी पाच सोडतीचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिली सोडत २७ फेब्रुवारीला काढण्यात येणार आहे. प्रत्येक सोडतीनंतर उर्वरित जागा, शाळा आॅनलाईन दिसणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया एप्रिलपर्यंत चालणार आहे. पालकांनी नजिकच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. आरक्षणाच्या नियमाप्रमाणे विविध आरक्षण असलेल्या जाती, जमाती, अल्पसंख्याकांना नर्सरी व पहिलीत प्रवेश देण्यात येणार आहे.