शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

छत्रपती संभाजीनगरातून अमेरिकन नागरिकांसोबत फ्रॉड; आउटबाउंड कॉल्सद्वारे उकळायचे पैसे!

By विकास राऊत | Updated: October 29, 2025 13:27 IST

आउटबाऊंड कॉल्स करून चालविला फ्रॉड उद्योग; डेटा प्रोव्हायडर वेबसाईटवर कोण कारवाई करणार ?

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा एमआयडीसीत १९९० च्या दशकात स्थापन झालेल्या एसटीपीआयमध्ये आजघडीला ४० लहान-मोठे आयटीशी (माहिती तंत्रज्ञान) निगडित उद्योग आहेत. अतिशय लहान आयटी पार्क असलेल्या या उद्योग वसाहतीतील कॉल सेंटरमधून आंतरराष्ट्रीय सायबर क्राईम होण्यासारखी घटना मंगळवारी उघडकीस आल्याने उद्योगविश्व चर्चेने ढवळून निघाले. आउटबाऊंड कॉल्स (डेटा मिळवून परदेशी नागरिकांना कॉल करणे) करून आंतरराष्ट्रीय फ्रॉडचा उद्योग उभारण्यामागे देशातील अनेक राज्यांतील नेटवर्क, डेटा प्रोव्हायडर वेबसाईट्स, बोगस ॲप्स तयार करून देणाऱ्या यंत्रणेचा हात असल्याचे बोलले जात आहे.

आयटी पार्कमधील कॉल सेंटरची सुमारे २० तास चौकशी करून पोलिसांनी आंतरराष्ट्रीय फसवणुकीचा पर्दाफाश केला. कोण-कोणत्या देशात फसवणूक केली आहे, त्याचा रेकॉर्ड तपासाअंती समोर येईल. वर्षभरापूर्वी देशातील विविध राज्यांमध्ये नेटवर्क असलेली टीम येथे आल्यानंतर त्यांनी आयटी पार्कमध्ये भाडेकरारावर घेतलेल्या कनेक्ट एन्टरप्रायजेस टी-७ एसटीपीआयमधून हा फसवणुकीचा उद्योग सुरू केला.

कॉल सेंटर्समधून कसे चालते काम?कॉल सेंटर म्हणजे एखाद्या कंपनीचे ग्राहकांशी थेट संवाद ठेवणारे केंद्र. फ्रंटलाइन एजंट्स कस्टमर एक्झिक्युटिव्ह म्हणून नेमलेल्या मुली व मुले ग्राहकांशी बोलतात. प्रत्येक टीमला मार्गदर्शन करणारा अधिकारी कॉल क्वालिटी आणि वेळेचे पालन करून विश्लेषण करतो. नवीन कर्मचाऱ्यांना संवाद कौशल्य, उत्पादन माहिती आणि ग्राहक हाताळणीचे प्रशिक्षण दिले जाते. कॉल सेंटर्स बहुतेक २४ तास सुरू असतात, परंतु आयटीपार्कमधील कॉल सेंटर नाईट शिफ्टमध्ये चालविले जात असे. प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज ठरावीक कॉल हँडलिंग टार्गेट होते. संगणकावर सीआरएमसारखे सॉफ्टवेअर वापरून महागड्या गॅझेटनुसार हे काम केले जात असे.

सायबर एक्सपर्ट काय म्हणतात?इंग्रजी भाषेत निपुण असलेल्या मुला-मुलींना वेतन व इन्सेन्टिव्ह देऊन असे फ्रॉड कॉल सेंटर उभे केले जातात. क्रेडिट कार्ड, लिंक्सवरून पेमेंट करायला सांगतात, अनेक ॲप्सची लिंक देऊन ते डाऊनलोड करण्यास सांगतात. स्क्रीन शेअरिंगची स्कीम देऊन लोन, कर, हप्त्यांमध्ये सवलत मिळेल, असे सांगतात. स्क्रीन शेअरिंग करताच ओटीपी दिसतो, तो कॉल सेंटरमधील टीम पाहून फायनान्शियल फ्रॉड करतात.

या कॉल सेंटर्सला डेटा प्रोव्हाइड करणाऱ्या साईट्स, कंपन्यांवरदेखील कारवाई अपेक्षित आहे. कारण या सर्व फसवणुकीची सुरुवात डेटापासूनच होते. आयटी पार्कमधील कॉल सेंटरवरील कर्मचाऱ्यांना आपण इतरांना फसवताेय, हे माहिती होते, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली तर अशा फसवणुकींना आळा बसेल.- मयूर दिवटे, सायबर एक्सपर्ट

English
हिंदी सारांश
Web Title : Fraud targeting Americans busted in Chhatrapati Sambhajinagar call center.

Web Summary : An international fraud operation targeting Americans was exposed in a Chhatrapati Sambhajinagar IT park. The call center used outbound calls to scam victims, highlighting a network of data providers and fraudulent app developers. Police investigated the operation, revealing a year-long scheme run from a rented space.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीUSअमेरिका