कॉल अथवा ओटीपी न येताच क्रेडिटकार्ड परस्पर वापरून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 20:15 IST2021-06-16T20:15:40+5:302021-06-16T20:15:40+5:30
क्रेडिट कार्डचा परस्पर वापर करून सायबर गुन्हेगारांनी ही रक्कम खर्च केली

कॉल अथवा ओटीपी न येताच क्रेडिटकार्ड परस्पर वापरून फसवणूक
औरंगाबाद: कोणताही कॉल अथवा ओटीपी विचारण्यात आलेला नसताना एका व्यक्तीचे क्रेडिट कार्ड परस्पर वापरुन ९३ हजार ५२५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविला.
खाजगी कंपनीत नोकरी करणारे तक्रारदार अनुप बावन श्रोत्रिय (रा. संघर्षनगर) हे ११ मे रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास घरी असताना त्यांच्या मोबाईलवर इंडसइंड बँकेच्या क्रेडिट कार्डवरून ९३ हजार ५२५ रुपये खर्च करण्यात आल्याचा मेसेज आला. हा मेसेज बारवाईने वाचल्यानंतर त्यांनी बँकेकडून त्यांना या व्यवहाराचे स्टेटमेंट ८ जून रोजी प्राप्त झाले. त्यांनी कुणालाही ओटीपी शेअर केला नाही आणि क्रेडिट कार्डाविषयी त्यांना कोणताही कॉल आला नाही. असे असताना त्याच्या क्रेडिट कार्डचा परस्पर वापर करून सायबर गुन्हेगारांनी ही रक्कम खर्च केल्याचे त्यांना समजले. याप्रकरणी त्यांनी तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर तपास करीत आहेत.