घाटी दवाखान्यात नोकरीच्या आमिषाने लाखोंचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:02 IST2017-10-25T01:00:08+5:302017-10-25T01:02:39+5:30
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १२ जणांना लाखोंना गंडा घालणा-या आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

घाटी दवाखान्यात नोकरीच्या आमिषाने लाखोंचा चुना
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १२ जणांना लाखोंना गंडा घालणा-या आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
राजेंद्र चरणसिंग पोहाल (रा. घाटी क्वॉर्टर) असे आरोपीचे नाव आहे. घाटीतील चतुर्थ कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी असून, घाटीत कामाला लावतो म्हणून प्रत्येकी २ लाख रुपये घेऊन बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली. १२ जणांना पोहाल याने बनावट नियुक्तीपत्र देऊन फसविल्याचे निदर्शनात आले. नोकरीसाठी कार्यालयात गेले असता हे गौडबंगाल उघड झाले. घाटी क्वॉर्टर येथे भेट घेऊन किशोर चंद्रभान देहाडे (रा. आदित्यनगर हर्सूल) यांनी विचारणा केली तेव्हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
भरतीच रद्द नंतर आॅर्डर देतो...
पोहाल याला विचारपूस केली असता, सध्या तुम्ही कार्यालयात येऊ नका भरतीच रद्द झाली आहे. भरती सुरू झाल्यावर नियुक्तीपत्र देतो, असे सांगून वेळ मारून नेऊ लागला. पैशाची मागणी केली असता १० दिवसांत पैसे परत करतो, असेही सांगत होता.