मालमत्ताकराचे धनादेश न वटलेल्या नागरिकांवर फसवणुकीचे गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:15 IST2021-02-05T04:15:10+5:302021-02-05T04:15:10+5:30

३ जानेवारी २०२१ पासून मालमत्ताकर व पाणीपट्टी वसुलीपोटी विविध मालमत्ताधारकांनी दिलेल्या धनादेशापैकी ३१ मालमत्ताधारकांनी १० लाख ९६ हजारांचे धनादेश ...

Fraud charges against citizens who do not clear property tax checks | मालमत्ताकराचे धनादेश न वटलेल्या नागरिकांवर फसवणुकीचे गुन्हे

मालमत्ताकराचे धनादेश न वटलेल्या नागरिकांवर फसवणुकीचे गुन्हे

३ जानेवारी २०२१ पासून मालमत्ताकर व पाणीपट्टी वसुलीपोटी विविध मालमत्ताधारकांनी दिलेल्या धनादेशापैकी ३१ मालमत्ताधारकांनी १० लाख ९६ हजारांचे धनादेश न वटता परत आले. न वटलेल्या धनादेश धारकांवर कारवाई करण्याचे निर्देश वाॅर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे थेटे यांनी नमूद केले. गुन्हे दाखल होणार म्हणताच काही मालमत्ताधारकांनी चार लाख २९ हजार रुपये मनपाकडे जमा केले. बँक खात्यात रक्कम नसताना धनादेश देत असल्याचे निदर्शनास आल्याने मालमत्ताधारकांनी महानगरपालिकेची फसवणूक केली आहे. यापुढे धनादेश न वटता परत आल्यास मालमत्ताधारकांना दंड आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती उपायुक्त तथा कर निर्धारक व संकलक यांनी दिली आहे.

५३ हजार रुपये दंड वसूल

औरंगाबाद : महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने मागील दोन दिवसांमध्ये शहरात ५३ हजार ७५० रुपये दंड वसूल केला. मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून ३६ हजार, कॅरीबॅगचा वापर करणाऱ्या व्यापार्‍यांकडून दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

तीन लाख ६० हजार रुपये कर वसुली

औरंगाबाद : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने स्वतंत्र टास्क फोर्स तयार केला आहे. सोमवारी या पथकाने शहरात तीन लाख ६० हजार रुपये मालमत्ता कर वसूल केला. पाणीपट्टी न भरणाऱ्या एका नागरिकाचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले.

रेल्वेस्टेशन, विमानतळावर २१० प्रवाशांची तपासणी

औरंगाबाद : दिल्लीहून साचखंड एक्स्प्रेसने शहरात दाखल झालेल्या १७७ प्रवाशांची रेल्वेस्टेशनवर कोरोना टेस्ट करण्यात आली. विमानतळावर ३३ प्रवाशांची तपासणी केली. नवीन मोंढा भाजी मंडईत ११ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

Web Title: Fraud charges against citizens who do not clear property tax checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.