शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

वाळूच्या हायवाचा पाठलाग करणाऱ्या महसूल पथकाच्या गाडीचा अपघात करण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 3:25 PM

हायवा आणि महसूल पथकाच्या गाडीमध्ये चारचाकी घालून अपघाताचा प्रयत्न 

ठळक मुद्देछावणी पोलीस ठाण्यात हायवा जमाप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सदरील चारचाकीचा परवाना रद्द करून ती जप्त करण्याबाबत पत्र

औरंगाबाद : जालना आणि बीडमधील अवैध वाळू उपसा व वाहतूक प्रकरणाने विधिमंडळाला धडक दिलेली असतानाच औरंगाबादमध्ये वाळूमाफियाचा पाठलाग करताना अप्पर तहसीलदारांच्या पथकासोबत भयावह थरार घडला. महसूल पथकाने मोठ्या शिताफीने वाळूचोरांना ताब्यात घेऊन छावणी पोलिसांत हायवा ट्रक क्र. एमएच-२० डीई-३३३५ जमा केला. तसेच पथकाच्या वाहनाला अपघात होईल, अशा पद्धतीने चारचाकी क्र. एमएच-२० ईएफ-३३३५ चालविल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सदरील चारचाकीचा परवाना रद्द करून ती जप्त करण्याबाबतही पत्र दिले आहे. 

नगरनाक्याकडून छावणीमार्गे वाळूने भरलेला हायवा ट्रक वेगाने येत होता. त्या हायवाच्या पाठीमागे मालकाची चारचाकी संरक्षणार्थ धावत होती. पाठलाग करण्यासाठी महसूलचे पथक सरसावताच हायवा मालकाने महसूल पथकाला पुढे जाऊ न देण्यासाठी चारचाकी मध्येच घुसविली. परिणामी, हायवाचालकाने धूम ठोकली. चारचाकी चालकही पळून गेला. मात्र, महसूलच्या पथकाने आयकर विभाग कार्यालयामागे त्यांना गाठले. शेवटी आयकर विभागामागे हायवा ट्रकमधील वाळू एका जागेवर टाकत असताना पथकाने पडकले. तेथेच गवांदे यांची स्वीफ्ट ही चारचाकीदेखील होती. याप्रकरणी छावणी पोलिसांत आणि आरटीओकडे तक्रार करण्यात आली आहे. हायवा ट्रक पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. हा सगळा थरार नगरनाका ते आयकर विभागापर्यंतच्या अंतरात घडला. तहसीलदारांनी कळविलेअप्पर तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी कळविले आहे, २९ जून रोजी दुपारी ३.३० वा. छावणीमधून नगररोडकडे जात असताना महसूल पथकाला वाळूने भरलेला एक हायवा ट्रक येत असल्याचे आढळून आले. त्या ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. त्या ट्रकच्या मागे पांढऱ्या रंगाची एक स्वीफ्ट चारचाकी होती. हायवाचा पाठलाग करीत असताना स्वीफ्ट चारचाकी चालकाने महसूल पथकाचे वाहन पुढे जाऊ दिले नाही. यामध्ये अपघात होण्याचा प्रसंग आला. हायवा ट्रक पळून जाण्यासाठी स्वीफ्टचालक गवांदे हा मदत करीत होता. दोन्ही वाहनांबाबत पोलिसांत, आरटीओमध्ये तक्रार दिली आहे.  

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागAccidentअपघातsandवाळूCrime Newsगुन्हेगारी