शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
3
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
6
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
7
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
8
सह्याद्री प्रकल्पात पट्टेरी 'टी-१' वाघ मुक्कामाला!
9
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
10
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
11
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
12
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
13
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
14
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
15
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
16
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
17
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
18
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
19
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
20
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!

चार महिन्यांत दुष्काळी भागात सरकारने काहीच केले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:31 PM

महाराष्टÑ शासनाने आॅक्टोबर महिन्यात काही जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले. मागील चार महिन्यांत दुष्काळग्रस्त भागात ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या, त्या अजिबात केलेल्या नाहीत. ग्रामीण भागात तर पाणी नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक प्राणी पाण्याअभावी तडफडून मरत आहेत.

ठळक मुद्देएच. एम. देसरडा : पाण्याअभावी जनावरांचाही तडफडून मृत्यू

औैरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने आॅक्टोबर महिन्यात काही जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले. मागील चार महिन्यांत दुष्काळग्रस्त भागात ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या, त्या अजिबात केलेल्या नाहीत. ग्रामीण भागात तर पाणी नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक प्राणी पाण्याअभावी तडफडून मरत आहेत. मराठवाड्यात तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी काहीच केले नाही. चार महिने निव्वळ स्वत:चा उदोउदो करण्यात घालवले, असा आरोप महाराष्टÑ राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष एच. एम. देसरडा यांनी आज केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना वेगवेगळे पत्र मंडळातर्फे देण्यात आल्याचे देसरडा यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. १९७२ मध्ये दुष्काळ असताना राज्यात १५ लाख नागरिक कामावर होते. आज त्यापेक्षाही भयावह परिस्थिती असताना रोहयो कामावर फक्त ९० हजार मजूर आहेत. जेसीबीने अनेक रोहयोची कामे सुरू आहेत. दहा लाख नागरिकांना आज कामाची गरज आहे. ग्रामीण भागात नागरिकांना काम नाही, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनतोय. दररोज दोन ते तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्यातील युतीचे सरकार शेतकरी, जनविरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक जिल्ह्यांमध्ये आजही उसाला पाणी दिले जात आहे. मद्यार्क कंपन्यांना पाणी दिले जात आहे. मोठ-मोठ्या उत्सवांसाठी पाणी देणे सुरू आहे. मराठवाड्यात ६० टक्केच जलसाठे आहेत. या जलसाठ्यांमधील पाणी सांभाळून वापरले पाहिजे. दुष्काळी भागातील अनेक तरुण शिक्षणासाठी विद्यापीठात आलेले आहेत. कमवा शिका योजना राबवून त्यांना आर्थिक हातभार दिला गेला पाहिजे. शेतकऱ्यांना ५०० रुपये निर्वाह भत्ता दररोज द्यावा. किसान सन्मान योजना धूळफेक असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी तलाठी ते जिल्हाधिकाºयांपर्यंत सर्व यंत्रणेने ठोस पाऊल उचलले पाहिजे. अन्नसुरक्षा कायद्यानुसार गरजू कटुंबाला अन्नधान्य द्यावे, आदी मागण्या देसरडा यांनी केल्या.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळ