अंबाजोगाईत साडेचार लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: July 30, 2014 00:48 IST2014-07-30T00:18:16+5:302014-07-30T00:48:42+5:30
अंबाजोगाई: बंदी असतानाही गुटख्याची विक्री करण्यासाठी मालाची वाहतूक करतांना ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून साडेचार लाख रुपये किंमतीचा गुटखा हस्तगत केला.
अंबाजोगाईत साडेचार लाखांचा गुटखा जप्त
अंबाजोगाई: बंदी असतानाही गुटख्याची विक्री करण्यासाठी मालाची वाहतूक करतांना ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून साडेचार लाख रुपये किंमतीचा गुटखा हस्तगत केला. ही कारवाई रविवारी अंबासाखर परिसरात झाली.
अंबाजोगाई येथील अतुल बालासाहेब शिंदे, अरूण राम जोगदंड व पप्पू लोहिया हे तिघेजण एम. एच. १२, झेड १०९४ या क्रमांकाच्या कारमधून गुटखा व तंबाखू तत्सम पदार्थ विक्रीसाठी घेऊन येत असतांना पोलिसांनी पकडले. हा सर्व ऐवज हस्तगत केला. गुटखा साडेचार लाख रुपये व कार ५० हजार रुपये असा पाच लाख रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सागरकुमार तेरकर यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध बंदी असतानाही गुटखा विक्रीसाठी साठवणे, वाहतूक करणे अशा विविध कारणांवरून गुन्हा नोंद झाला आहे.
या प्रकरणाचा पोलिस तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत चौधरी करत आहेत. (वार्ताहर)