बोळेगावात चार घरांना आग
By Admin | Updated: June 6, 2014 01:06 IST2014-06-06T00:09:37+5:302014-06-06T01:06:39+5:30
सगरोळी: भात गवताच्या गंजीला लागलेल्या आगीचे लोण घरापर्यंत पोहचल्याने साहित्यासह शेती अवजारे, अन्नधान्य खाक झाली.

बोळेगावात चार घरांना आग
सगरोळी: भात गवताच्या गंजीला लागलेल्या आगीचे लोण घरापर्यंत पोहचल्याने साहित्यासह शेती अवजारे, अन्नधान्य खाक झाली. यात अंदाजे एक ते दीड लाखांचे नुकसान झाले. ही घटना बिलोली तालुक्यातील सगरोळी पासून जवळच असलेल्या बोळेगाव येथे बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.
खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजा शेतीच्या मशागततीत व्यस्त आहे. नकलेकर मलगोंडा, सिदगोंडा (खु), शिवाजी मलगोंडा नकलेकर, दत्तराम हाणमंता घंटे, चौतराबाई दत्तराम घंटे यांच्यासह काही जन शेतात तर काही जण टी.व्ही. पाहण्यासाठी शेजारच्या घरी गेले होते. दरम्यान, बुधवारी दुपारी घराच्या पाठीमागे लगतच्या भात गवताच्या गंजीने पेट घेतला. काही वेळाला आग लागल्याने ही बाब लवकर लक्षात आली नाही. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केल़
बिलोलीचे पोलिस उपनिरीक्षक संदीप आराक, बीट जमादार मुक्तावार, पोहेकॉ यालावार यांनी घटनास्थळी ताबडतोब भेट देवून आग विझविण्यास सहकार्य केले. मंडळ अधिकारी शेख यांनी ही घटनास्थळी भेट देवून नुकसानीचा अंदाज घेतला. बिलोली पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली. गवताच्या गंजीला आग कोणी लावली अथवा कशाने लागली या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीत श्ेतकर्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत. (वार्ताहर)
घटनास्थळी घेतली नागरिकांनी धाव
आग लागली तेंव्हा घरातील सर्वजन शेतीच्या व इतर कामात व्यस्त होते. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविली़
पाण्याचा मारा करुन तब्बल एक ते दीड तासानंतर आग विझविण्यात यश आले.आगीत घरात साठवलेले ज्वारी, गहू, तांदूळ, दाल, शेती अवजारे, संसारोपयोगी साहित्य, जनावरांचे खाद्य जळून खाक झाले.