शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

चार घरांवर कोसळले सेंट्रिंग

By admin | Updated: January 23, 2015 00:58 IST

औरंगाबाद : रमानगरमधील इमारतीचे सेंट्रिंग कोसळून मागच्या चार खोल्यांवर पडल्याने पत्र्यांचे छत व भिंती पडल्या. यात चार जण जखमी झाले.

औरंगाबाद : रमानगरमधील इमारतीचे सेंट्रिंग कोसळून मागच्या चार खोल्यांवर पडल्याने पत्र्यांचे छत व भिंती पडल्या. यात चार जण जखमी झाले. वर्षभरापूर्वीच येथील रमानगरमधील मगरे परिवाराच्या घराला आग लागली होती. त्यांनी पै-पै जमा करून तिथे नवीन खोल्या बांधल्या. आठ दिवसांनंतर ते राहण्यासाठी येणार होते. मात्र, त्याआधीच छत कोसळले. दुर्घटना काही आमचा पिच्छा सोडेना, असे म्हणत रावसाहेब मगरे यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मगरे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस स्टेट बँक कॉलनी आहे. येथे पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सेंट्रिंग लावताना पाठीमागील घरांवर बांधकाम साहित्य पडू नये यासाठी संबंधित बिल्डरने कोणतीच दक्षता घेतली नव्हती. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सेंट्रिंगचे काम सुरू होते. गुरुवारी ४.३० वाजेच्या सुमारास अचानक सेंट्रिंग कोसळले. ते बाजूच्या घरांवर जाऊन आदळले. यात चार घरांवरील पत्र्यांचे छत व भिंती पडल्या. यातील दोन खोल्या या लक्ष्मण मगरे व रावसाहेब मगरे यांच्या आहेत. त्यांनी तिथे नवीन खोल्या बांधल्या. या खोल्यांना रंग देण्याचे काम सुरू होते. जोराचा आवाज ऐकून रंग देणारे घरातून बाहेर पळाले आणि छत पडले. यात दिनेश गायकवाड, रावसाहेब मगरे, अरुणा मगरे, प्रेम दाभाडे हे जखमी झाले. त्यांना घाटीत नेण्यात आले. याशिवाय नितीन खोतकर व भिकन पवार यांच्या दोन खोल्यांचे छत व भिंती पडल्या. येथे विनोद शर्मा हे जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर येथे नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. उस्मानपुरा ठाण्याच्या पोलिसांनी येऊन माहिती घेतली. लक्ष्मण मगरे यांनी आरोप केला की, आमच्या घराच्या मागील बाजूस स्टेट बँक कॉलनीत बिल्डरने ५ मजली इमारत बांधली; पण बांधकाम करताना आसपासच्या रहिवाशांची कोणतीच काळजी घेतली नाही. ४बांधकामाचे साहित्य घरावर पडू नये म्हणून नेटची जाळी बसविणे अपेक्षित होते; पण वारंवार सांगूनही बिल्डरने दुर्लक्ष केले. संबंधित बिल्डरने झालेले संपूर्ण नुकसान भरून द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली. चार खोल्यांपैकी एका खोलीत विमलबाई डोणे ही ६२ वर्षांची महिला भाड्याने राहते. खोलीत त्या व त्यांची मुलगी मयुरी (१८) या दोघी दुपारच्या वेळी झोपल्या होत्या.४मात्र, छत पडण्याच्या १० मिनिटे आधीच दोघी जणी झोपेतून उठल्या व साखर आणण्यासाठी किराणा दुकानावर गेल्या. त्याचवेळी मोठा आवाज झाला. या आवाजाने धावपळ उडाली. ४विमलबाई जिथे राहतात त्या खोलीच्या पाठीमागील इमारतीचे सेंट्रिंग त्यांच्या खोलीच्या छतावर कोसळले. हे पाहून त्यांना धक्काच बसला. पण नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, असे विमलबाई सांगत होत्या.