जिल्ह्यात चौघांचा मृत्यू
By Admin | Updated: September 13, 2015 00:01 IST2015-09-12T23:47:51+5:302015-09-13T00:01:21+5:30
जालना : जिल्ह्यात वेग-वेगळ्या घटनांत शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये शनिवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात चौघांचा मृत्यू
जालना : जिल्ह्यात वेग-वेगळ्या घटनांत शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये शनिवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
पहिल्या घटनेत जालना शहरातील रामनगर कॉलनी येथील नरेंद्र लामवेल ढिल्पे (५०) हे शंभर टक्के भाजल्याने त्यांना शनिवारी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले होते. उपचारारम्यान शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत बदनापूर तालुक्यातील तपोवन येथील रवींद्र रामदास जगदाळे (२५) याला शुक्रवारी औषधीतून विषबाधा झाली. त्यास जालन्यातील खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. सदर बाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या घटनेत पुणेगाव येथील उषा सांडू सोरमारे (३१) या महिलेने विषारी द्रव सेवन केल्याने तिला औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला.
चौथ्या घटनेत जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथील दर्शननगर येथील विवाहिता सोनाली मनोज हिवाळे (२३) हिचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला.