विविध घटनामध्ये चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:37 IST2017-09-07T00:37:34+5:302017-09-07T00:37:34+5:30

जिल्ह्यात विविध घटनामध्ये चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यात- त्या पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Four deaths in various incidents | विविध घटनामध्ये चौघांचा मृत्यू

विविध घटनामध्ये चौघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
लोकमत चमू : जिल्ह्यात विविध घटनामध्ये चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यात- त्या पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर शिवारातील एका विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून पडल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता घडली. सुरेश नारायण बोनतुले (३०,रा.कळंबा, ता.लोहा ह.मु.शिरडशहापूर ) असे मयताचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक शंकर वाघमोडे, जमादार वाघमारे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. कुरूंदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, २ मुली, १ मुलगा असा परिवार आहे.
तसेच हिंगोली तालुक्यातील वडद येथे विहिरी पडून विविाहितेचा मृत्यू झाला. सुरेखा विष्णू लांडगे (२७) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनास्थळी पोनि. जगदीश भंडरवार, नंदू मस्के दाखल झाले. याप्रकरणी शंकर बाबाराव पाटील (गायकवाड) यांच्या खबरीवरुन मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोना. नंदकुमार मस्के हे करीत आहेत.
तर वसमत येथील रामदास गायकवाड यांना १ सप्टेंबर रोजी सर्पदंश झाला होता. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने त्यांना नांदेड येथे रेफर केले असता त्यांचा उपचारादरम्यान ५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथे शेतात वानरे हाकण्यासाठी गेलेल्या युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला. संदीप दिगंबर काळे (२४) असे यूवकाचे नाव आहे. युवकाच्या शेतातून विद्युत तारा गेल्या होत्या.

Web Title: Four deaths in various incidents