शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील चार मोठी धरणे मृतसाठ्यातच

By admin | Updated: August 17, 2016 00:53 IST

औरंगाबाद : निम्मा पावसाळा संपल्यावरही मराठवाड्यातील माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव हे चार मोठे प्रकल्प मृतसाठ्यातच आहे

औरंगाबाद : निम्मा पावसाळा संपल्यावरही मराठवाड्यातील माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव हे चार मोठे प्रकल्प मृतसाठ्यातच आहे. याशिवाय येलदरी आणि मनार प्रकल्पातही दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे विभागात दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे.भीषण दुष्काळानंतर मराठवाड्यात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे पीक परिस्थिती सुधारली. तसेच नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणातही बऱ्यापैकी जलसाठा झाला; परंतु अजूनही मराठवाड्यातील अनेक प्रकल्प रिकामेच आहेत. त्यातही मोठ्या प्रकल्पांची अवस्था वाईट आहे. मराठवाड्यात एकूण अकरा मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सरासरी ४० टक्के साठा आहे. विभागातील माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव या चार धरणांमध्ये मात्र शून्य टक्के साठा आहे. तसेच येलदरी धरणात ९ टक्के, मानार धरणात १० टक्केच साठा आहे. विभागात केवळ विष्णुपुरी या एकाच प्रकल्पात ८८ टक्के असा मोठा जलसाठा झाला आहे.