साडेचार लाखांची घरफोडी

By Admin | Updated: May 3, 2017 00:23 IST2017-05-03T00:18:18+5:302017-05-03T00:23:27+5:30

जालना :चोरट्यांनी सरस्वती कॉलनी येथील गिरजानंद भगत यांचे घर फोडून कपाटातील ८ तोळे सोने, रोख २ लाख ९५ हजार असा ४ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.

Four and a half million bribe | साडेचार लाखांची घरफोडी

साडेचार लाखांची घरफोडी

जालना : घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी सरस्वती कॉलनी येथील गिरजानंद भगत यांचे घर फोडून कपाटातील ८ तोळे सोने, रोख २ लाख ९५ हजार असा ४ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्री येथे घडली.
औरंगाबाद येथे नातेवाईकांचे विवाह सोहळा असल्याने गिरजानंद भगत यांचे संपूर्ण कुंटूबीय लग्न सोहळ्यासाठी गेले होते.
ही संधी चोरट्यांनी साधून घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील सोन्याचांदीचे ८ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख २ लाख ९५ हजार रूपये चोरून नेले. मंगळवारी सकाळी भगत कुंटूबीय लग्नसोहळ्यावरून शहरात आले असता त्यांना घराचे मुख्य दरवाजाच्या कुलूप तुटलेले दिसले.त्यांनी घरातील कपाटाची पाहणी केली कपाट तोडून त्यातील सोने आणि मुद्देमाल चोरीस नेल्याचे निर्दशनात आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी गिरजानंद भगत यांच्या तक्रारीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

Web Title: Four and a half million bribe