फुलंब्री तालुक्यात यंदा लावणार साडेचार लाख झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST2021-06-09T04:06:36+5:302021-06-09T04:06:36+5:30
तालुक्यात ५ जून ते १५ ऑगस्टदरम्यान ही मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभाग ७० हजार व ...

फुलंब्री तालुक्यात यंदा लावणार साडेचार लाख झाडे
तालुक्यात ५ जून ते १५ ऑगस्टदरम्यान ही मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभाग ७० हजार व वनविभागाकडून २० हजार रोपटे पुरविली जाणार आहेत, तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, फळबाग लागवड व ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही झाडे विकत घेतली जाणार आहेत. ही झाडे शेती बांध, विहिरीभोवतालचा परिसर, पडीक जमीन, नदीकाठ, चराई क्षेत्र, तसेच गावात ग्रामपंचायत कार्यालय परिसर, गावठाण जमीन, प्रत्येक धार्मिक स्थळे, गावाला जोडणाऱ्या व वस्त्यांवरील रस्त्यांच्या दुतर्फा लावली जाणार आहेत. गणोरी ग्रामपंचायतच्या वतीने वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी विलास गंगावणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसन्ना भाले, विस्तार अधिकारी डी. ए. जायभाये, डॉ.सतीश साबळे, डॉ.रविराज पवार, सरपंच सरला संतोष तांदळे, ग्रामविकास अधिकारी सुरेश चौधरी, संतोष तांदळे आदींची उपस्थिती होती.
चौकट
या झाडे लावली जाणार
सामाजिक वनीकरण विभागाने आपल्या रोपवाटिकेत सतरा जातीचे झाडे तयार केले आहेत. यात पिंपळ, पळस, वड, आंबा, फणस, पेरू, जांभूळ, सीताफळ, सिसम, हातगा, बेळा, बांबू, सागवान, निंब, कडुनिंब, चिंच, आवळा आदी वृक्षांचा समावेश आहे.
फोटो : गणोरी येथे वृक्षलागवड करताना गटविकास अधिकारी विलास गंगावणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसन्ना भाले, विस्तार अधिकारी डी.ए. जायभाये आदी.
070621\img-20210607-wa0226.jpg
गणोरी येथे वृक्षलागवड करताना गटविकास अधिकारी विलास गंगावणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना भाले, विस्तार अधिकारी डी. ए. जायभाये आदी.