डेंग्यूचे १३ रुग्ण आढळले

By Admin | Updated: September 1, 2014 01:08 IST2014-09-01T01:01:16+5:302014-09-01T01:08:39+5:30

लातूर : शहरात मागील काही दिवसापासून डेंग्यूच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Found 13 patients of dengue | डेंग्यूचे १३ रुग्ण आढळले

डेंग्यूचे १३ रुग्ण आढळले


लातूर : शहरात मागील काही दिवसापासून डेंग्यूच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील वेगवेगळ्या बाल रुग्णालयात डेंग्यूचे १३ रुग्ण उपचार घेत आहेत़ या शिवाय अनेक संशयीत डेंग्यू रुग्णही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचे रक्तजल नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़
लातूर जिल्ह्यात जून महिन्यापासून ते सद्य:स्थितीत हिवताप, चिकुनगुनिया, डेंग्यूच्या साथ रोगाने थैमान घातले आहे. ताप, चिकुनगुनिया व डेंग्यू या साथरोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत़ डेंग्यूचे रुग्ण जून महिन्यात ६ रुग्ण, जुलै महिन्यात ८ रुग्ण, आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभी १० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते़ त्यातील ८ रुग्ण हे शहर भागातील तर २ रुग्ण हे ग्रामीण भागातील होते़ यानंतरही शहरातील विविध बाल रुग्णालयात १३ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. जिल्हा हिवताप विभागाकडून नांदेड येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी ३० रक्तजल नमूने तपासणीसाठी पाठवले आहेत़ यातील डेंग्यूची लागण झालेले रुग्ण हे शहरातील आहेत़ डेंग्यूच्या रुग्णात होणारी वाढ ही शहराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे़ शहरात वाढलेली घाण, अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी, गल्ली बोळात साठलेला कचरा आदी कारणामुळे डासोत्पाती होते. यामुळे साथीचे रोग बळावत आहेत़ (प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यात साथ रोगाचे रुग्णवाढत असतानाही जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने रुग्णाच्या रक्ताची तपासणी केवळ महिन्याच्या सुरुवातीला १५ तासखेस व शेवटी ३० तारखेलाच रक्तजल नमूने तपासणीसाठी नांदेडच्या लॅबला पाठवले जातात़ पंधरा दिवस हे रक्तजल नमूने हिवताप विभागात संकलीत केले जातात़ या रक्तजल नमून्याचा तपासणी अहवाल येईपर्यत हा रुग्ण उपचार घेवून घरी जातो़ यामुळे रुग्णाच्या नातेवाईकात संताप व्यक्त होत आहे़

Web Title: Found 13 patients of dengue