शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

माजी कुलगुरूंच्या काळातील घोटाळ्यांची नव्याने होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 2:38 PM

एस.एफ. पाटील अहवालावर कार्यवाहीसाठी उचलली पावले

ठळक मुद्देउच्च शिक्षण संचालकांचे प्रशासनाला पत्र

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळातील विविध भ्रष्टाचारांचा आरोप झालेल्या प्रकरणांची पुन्हा नव्याने चौकशी होणार आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण सचिवांनी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांना आदेश दिले आहेत. यानुसार चौकशीसाठी विद्यापीठ प्रशासनाला बुधवारी (२७) उच्च शिक्षण विभागाचे पत्र प्राप्त झाले आहे. याला विद्यापीठ प्रशासन आणि डॉ. माने यांनीही दुजोरा दिला आहे. 

विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. चोपडे यांच्यावर बारकोड उत्तरपत्रिकांच्या खरेदीमध्ये अनियमितता असल्याचा पहिला आरोप करण्यात आला होता. रुजू झाल्यानंतर त्यांनी तातडीने दोन वेळा सुमारे दीड कोटींच्या उत्तरपत्रिका खरेदी केल्या होत्या. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन अधिसभा सदस्य डॉ. सर्जेराव ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने कुलगुरूंना वाचवण्यासाठी ‘नियम पायदळी तुडवले गेले; पण भ्रष्टाचार झालेला नाही’ असा शेरा मारून क्लीन चिट दिली होती. या प्रकरणानंतर विद्यापीठात विविध विभागांमध्ये चढ्या दराने खरेदी, ओएसडी भरती प्रकरण, परीक्षा विभागाचा ३ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी स्वत:च्या खात्यात वळती करणे, स्वत:च्या स्वाक्षरीने धनादेश देणे अशा विविध प्रकरणांत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले होते.

याशिवाय विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीतही नियमबाह्यपणे नेमणुका करण्यात आल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणाला विधान परिषदेत आ. सतीश चव्हाण यांनी वाचा फोडली होती. तेव्हाचे तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यपालांच्या मान्यतेनुसार कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या कार्यकाळातील सर्वच आरोपांची चौकशी करण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या समितीने चार महिने सर्व आरोपांची चौकशी करीत राज्य शासनाला अहवाल सादर केला होता. या अहवालामध्ये कुलगुरू डॉ. चोपडे यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना पुष्टी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शासनाने कारवाई करण्यापूर्वी डॉ. एस. एफ. पाटील समितीच्या चौकशीतील तथ्याची पडताळणी करण्याचे  उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांना आदेश दिले आहेत.

कागदपत्रांची पडताळणी होणारराज्य शासनाकडे डॉ. पाटील समितीने सादर केलेला अहवाल राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे.  त्यात डॉ. चोपडे यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले आहे. हा अहवाल अतिशय गोपनीय ठेवण्यात आलेला आहे. शासन पुन्हा एकदा नव्याने अहवालातील आरोपांची शाहनिशा करणार आहे. याविषयी उच्च शिक्षण संचालक डॉ. माने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राज्य शासनाने तत्कालीन कुलगुरूंवर झालेल्या आरोपांची पडताळणी करण्यास सांगितले आहे. त्यासाठी मला पत्र मिळाले. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवून घोटाळ्यांचा आरोप असलेली कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे सुचवले आहे. कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली जाईल. डॉ. पाटील समितीच्या अहवालाची सत्यता पडताळणे हाच शासनाचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रfraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबाद