युवकांना हर्षवर्धन जाधव मार्गदर्शन करणार; औरंगाबादमध्ये होणार युवक मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2022 15:20 IST2022-06-16T15:18:16+5:302022-06-16T15:20:01+5:30
युवकांच्या विविध समस्या आणि बेरोजगार सोडवण्याच्या अनुषंगाने सदरील मेळाव्याचे आयोजन

युवकांना हर्षवर्धन जाधव मार्गदर्शन करणार; औरंगाबादमध्ये होणार युवक मेळावा
औरंगाबाद- औरंगाबाद शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात युवकांसाठी १८ जून रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
युवकांच्या विविध समस्या आणि बेरोजगार सोडवण्याच्या अनुषंगाने सदरील मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी आज रोजी दिली, असून हा मेळावा १८ जून रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात घेणार असल्याची माहिती त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.