शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पँथर काळाच्या पडद्याआड! माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे दीर्घ आजाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 11:38 AM

उद्या रविवारी सायंकाळी ५ वाजता उस्मानपुरा येथील नागसेन विद्यालय परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर: पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाचे एक अग्रणी नेते माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७६ वर्ष होते. उद्या रविवारी सायंकाळी ५ वाजता उस्मानपुरा येथील नागसेन विद्यालय परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माजी मंत्री गंगाधर गाडे यांचा जन्म १९३९ मध्ये अमरावती जिल्ह्यातील मोरशी तालुक्यातील कवठाळ येथे झाला. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक दलित वसाहती त्यांनी वसवल्या. गंगाधर गाडे हे एक प्रभावशाली दलित नेते होते. त्यांनी दलित हक्कांसाठी अनेक लढे दिले. ते मागील काही वर्षांपासून आजारी होते. त्यांच्यावर काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे साडेचार वाजता उपचारादरम्यान त्यांनी अखेच श्वास घेतला. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव उद्या रविवार ( दि. ५) रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत उस्मानपुरा, पीरबाजार येथील नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सूर्यकांता गाडे, मुलगा डॉ. सिद्धांत गाडे, सून डॉ. भावना वंजारी-गाडे, बहिण निर्मला गवई, मेहुणे गुणवंत गवई, नातवंडे असा परिवार आहे. 

पँथर विद्यार्थी नेता ते राज्यमंत्री प्रवासछत्रपती संभाजीनगरमध्ये १९७० च्या दशकात मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेत असताना शिष्यवृत्तीच्या प्रश्नावरून गंगाधर गाडे यांचे विद्यार्थी नेतृत्व उदयाला आले होते. विद्यार्थी नेते म्हणून गंगाधर गाडे यांनी नागसेनवन आणि विद्यापीठात चांगली पकड निर्माण केली होती. मराठवाड्यातील विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या नामांतर आंदोलनाचे अग्रणी नेतृत्व गाडे यांनी केले. पुढे कॉँग्रेस सरकारमध्ये गाडे यांनी राज्यमंत्री पद देण्यात आले. माजीमंत्री गाडे यांनी विद्यार्थी हिताचे अनेक आंदोलने हाती घेऊन ती यशस्वी केली. या दरम्यान अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवली. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

गंगाधर गाडे यांच्या निधनाने दलित चळवळीला धक्का- राजेंद्र दर्डाराज्याचे माजीमंत्री आणि लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी नागसेन विद्यालय परिसरातील गंगाधर गाडे यांच्या निवासस्थानी जाऊन गाडे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सूर्यकांता गाडे, डॉ. सिद्धांत गाडे यांचे सांत्वन राजेंद्र दर्डा यांनी केले. राजेंद्र दर्डा आणि गंगाधर गाडे हे एकाच मंत्रिमंडळात सहकारी म्हणून कार्यरत होते.  तसेच दोघांचाही जन्मदिवस एकाच तारखेला म्हणजे २१ नोव्हेंबरला आहे. गंगाधर गाडे यांच्या जाण्याने दलित चळवळीला मोठा धक्का बसला असून ही हानी भरून न येणारी आहे. गंगाधर गाडे यांचे नामांतर चळवळ तसेच छत्रपती संभाजीनगर शहरात विविध नागरी वसाहती वसविण्याचे कार्य मोलाचे आहे, अशा शब्दात राजेंद्र दर्डा यांनी आदरांजली व्यक्त केली.

टॅग्स :Gangadhar Gadeगंगाधर गाडेAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद