चातुर्मास कळसाची विधीवत स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST2021-02-05T04:17:58+5:302021-02-05T04:17:58+5:30
यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना आर्यिका विशाश्री माताजी म्हणाल्या की, मनुष्य हा कर्माने महान होत असतो. मनुष्यजीवन हे परमेश्वराकडून मिळालेले ...

चातुर्मास कळसाची विधीवत स्थापना
यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना आर्यिका विशाश्री माताजी म्हणाल्या की, मनुष्य हा कर्माने महान होत असतो. मनुष्यजीवन हे परमेश्वराकडून मिळालेले वरदान असून आपले विचार, आचरण नेहमी शुद्ध व निर्मळ ठेवले पाहिजे. यानंतर चातुर्मास कळसाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी माताजींचे पादपक्षालन व पुष्पवृष्टी करण्यात येत होती. त्यानंतर कळसाची विधीवत स्थापना करण्यात आली.
आ. अतुल सावे, पंचायत अध्यक्ष ललीत पाटणी, सचिव अशोक अजमेरा, उपाध्यक्ष विनोद लोहाडे, सहसचिव नरेंद्र अजमेरा, सुमन पाटणी, मनीषा पाटणी, शाहू पाटणी, मोनाली पाटणी, शर्मिला पांडया, लवीश पांड्या, एम. आर. बडजाते, चंदा पाटणी, डॉ. रमेश बडजाते, चांदमल चांदीवाल, किरण पहाडे, प्रकाश अजमेरा, जितेंद्र पहाडे, संजय पापडीवाल, महावीर पाटणी यांच्यासह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फोटो ओळ :
चातुर्मास कळसाची विधीवत स्थापना.