परभणीत पाऊस
By Admin | Updated: August 24, 2014 23:53 IST2014-08-24T23:19:16+5:302014-08-24T23:53:37+5:30
परभणी: पोळा सणाच्या आदल्या दिवशी परभणी व परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

परभणीत पाऊस
परभणी: पोळा सणाच्या आदल्या दिवशी परभणी व परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.
यावर्षी पावसाने मोठा ताण दिल्यामुळे पीक परिस्थिती धोक्याची झाली आहे. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा पोळा सण दुष्काळच्या छायेत असतानाच रविवारी मध्यम स्वरुपाचा पाऊस परभणी शहर व परिसरात झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. १० ते १५ मिनिटे हा पाऊस होता. त्यानंतर सायंकाळी देखील एक-दोन सरी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, अद्यापपर्यंत सर्वदूर पाऊस झालेला नाही. काही भागात पाऊस तर काही भाग कोरडा अशी स्थिती असल्याने चिंता वाढत आहे. (प्रतिनिधी)