भोजन निकृष्ट; विद्यार्थ्यांना अपचन
By Admin | Updated: August 1, 2014 00:26 IST2014-08-01T00:01:15+5:302014-08-01T00:26:10+5:30
लातूर : समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन चांगले मिळत नसल्याने अपचन होत असल्याच्या तक्रारी सहाय्यक समाजकल्याण आयुक्तांकडे विद्यार्थ्यांनी केली़

भोजन निकृष्ट; विद्यार्थ्यांना अपचन
लातूर : समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन चांगले मिळत नसल्याने अपचन होत असल्याच्या तक्रारी सहाय्यक समाजकल्याण आयुक्तांकडे विद्यार्थ्यांनी केली़ सहाय्यक आयुक्ताने तात्काळ वसतिगृहात जाऊन स्वत: भोजनाची चव घेतली़ भोजन निकृष्ट असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तात्काळ कंत्राटदाराला बदलून टाकले़
समाजकल्याण विभागाच्यावतीने १२ नंबरपाटी येथे १ हजार विद्यार्थ्यांची सोय होईल असे भव्य वसतिगृह आहे़ या वसतिगृहात विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची सोय आहे़ वसतिगृहातील युनिट क्रमांक १ व युनिट क्रमांक २ मध्ये चांगले भोजन मिळते़ परंतु युनिट क्रमांक ३ मध्ये गेल्या काही दिवसापासून निकृष्ट भोजन दिले जात होते़
त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अपचनाच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या़ बुधवारी युनीट क्रमांक ३ मधील काही विद्यार्थ्यांना वसतिगृहातील भोजनामुळे जुलाब होण्यास सुरूवात झाली़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुरूवारी थेट समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त एस़आऱदाणे यांची भेट घेतली आणि भोजनाबद्दलच्या तक्रारी केल्या़ दाणे यांनीही तात्काळ वसतिगृहात जावून विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या भोजनाची चव घेतली़ युनीट क्रमांक १ व २ चे भोजन चांगले पण युनीट क्रमांक ३ मधील विद्यार्थ्यांना कंत्राटदारांकडून भोजन चांगले मिळत नसल्याची खात्री झाली़ त्यामुळे सहाय्यक आयुक्त दाणे यांनी तात्काळ युनिट क्रमांक ३ च्या कंत्राटदाराला बदलून भोजनाचे काम युनिट क्रमांक १ च्या कंत्राटदाराला दिले़ (प्रतिनिधी)
सहा़ आयुक्तांची भेट
वसतिगृहात निकृष्ट भोजन मिळत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केल्यानंतर सहाय्यक आयुक्त दाणे यांनी वसतिगृहात भेट दिली़ भोजन कक्षात अन्नाची चव घेतली़ खात्री पटताच त्यांनी कंत्राटदाराचे काम थांबविले़