शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
4
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
5
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
6
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
7
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
8
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
9
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
10
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
11
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
12
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
13
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
14
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
15
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
16
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
17
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
18
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
19
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
20
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या काळ्या बाजाराला आळा

By admin | Updated: September 3, 2014 00:20 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या बायोमेट्रिक पद्धतीमुळे रेशनवरील काळ्या बाजाराला काही प्रमाणात आळा बसला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या बायोमेट्रिक पद्धतीमुळे रेशनवरील काळ्या बाजाराला काही प्रमाणात आळा बसला आहे. बायोमेट्रिक मशीन बसलेल्या दुकानांवर कधी नव्हे ते लाभार्थ्यांचे धान्य शिल्लक राहत आहे. आॅगस्ट महिन्याअखेरीस तब्बल ८४ टक्के केशरी कार्डधारकांचे धान्य या दुकानांवर शिल्लक राहिले आहे. अंत्योदय आणि प्राधान्य गटातील बहुतांश लाभार्थ्यांचे धान्यही शिल्लक दिसून आले आहे. अनेक लाभार्थी रेशन दुकानावरून अन्नधान्य नेत नाहीत. तरीही दुकानदारांकडून सर्वच लाभार्थ्यांनी धान्याची उचल केल्याचे दाखवून त्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते. या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वर्षभरापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक पद्धत लागू केली. या अंतर्गत लाभार्थ्याच्या बोटाचे ठसे घेऊनच त्यांना धान्याचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १७७७ पैकी २७ दुकानांवर ही पद्धत लागू करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित दुकानदारांना टॅब्लेट देण्यात आले आहेत. बोटाचे ठसे जुळल्यानंतर लगेचच टॅब्लेटद्वारे त्याची आॅनलाईन नोंद होते. त्यामुळे कोणत्या आणि किती लाभार्थ्यांनी धान्य नेले, कोणत्या लाभार्थ्यांनी धान्य उचलले नाही, हे लक्षात येते. त्यामुळेच आता कधी नव्हे ते रेशन दुकानांवर धान्य शिल्लक राहिल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद शहरातील ९, फुलंब्री तालुक्यातील ९ आणि गंगापूर तालुक्यातील ९ दुकानांवर सध्या बायोमेट्रिक यंत्रणा कार्यरत आहे. या दुकानांवर आॅगस्ट महिन्यात बहुतांश लाभार्थ्यांचे धान्य शिल्लक राहिले असल्याचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी मंगळवारी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या २७ दुकानांवर एपीएलचे (केशरी) १८ हजार कार्डधारक आहेत. यातील अडीच हजार कार्डधारकांनीच धान्य नेले. अंत्योदय योजनेच्या २२ टक्के लाभार्थ्यांनीही रेशनकडे पाठ फिरविली. अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्यक्रम गटातील २४ टक्के लाभार्थ्यांनीही धान्य घेतलेले नाही. या दुकानांवरील प्राधान्यक्रम गटातील लाभार्थ्यांची संख्या ७७०० इतकी आहे. यापैकी १८०० जणांनी धान्य उचलले नाही.