शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

चारा, पाण्याअभावी जनावरांचे स्थलांतर

By admin | Updated: December 12, 2014 00:54 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई सलग तीन वर्षांपासून पडणारा अपुरा पाऊस यामुळे तालुक्याला दुष्काळाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. महिनाभरापासून निर्माण झालेली

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईसलग तीन वर्षांपासून पडणारा अपुरा पाऊस यामुळे तालुक्याला दुष्काळाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. महिनाभरापासून निर्माण झालेली पाणीटंचाई व चाऱ्याचा प्रश्न यामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ लागले आहे. ऊसतोडीसाठी गेलेल्या कामगारांच्या पाठोपाठ शेतकरी व शेतमजूर आपली जनावरे घेऊन गावोगावी फिरत असल्याने तालुक्यातील अनेक गावे आता ओस पडू लागली आहेत. अंबाजोगाई तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस पडू लागल्याने सर्वत्र जलसाठ्यांनी तळ गाठला आहे. गेल्या दोन वर्षांत एकही मोठा पाऊस न झाल्याने नद्या, तलाव यांचे पाणी वाहिले नाही. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. तालुक्यातील डोंगराळ भागात तर सध्या चारा व पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील चिचखंडी, येल्डा, कुरणवाडी, राक्षसवाडी, हडंगवस्ती, मंगयीवाडी, या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात ऊसतोडीसाठी गेले आहेत. त्या पाठोपाठ आता गावातील उर्वरित शेतकरी व शेतमजुरही चारा व पाण्याअभावी स्थलांतर करू लागले आहेत. अगोदरच खरीप हंगामही पावसाअभावी संकटात सापडला. त्यामुळे सोयाबीन, बाजरी, संकरित ज्वारीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली. परिणामी जनावरांसाठी कडबा राहिला नाही. पिण्यासाठी पाण्याचीही उपलब्धता नाही. अशा स्थितीत पशुधन जगवायचे कसे? या भेडसावणाऱ्या समस्येमुळे शेतकऱ्यांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढू लागले आहे. या संदर्भात अद्यापही प्रशासकीय पातळीवर ठोस उपाययोजना आखण्यात आल्या नाहीत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. डोंगर परिसरातील गावांमध्ये शासनाच्या वतीने चारा व पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी चिचखंडी येथील सरपंच गुणवंत बिरगड यांनी केली आहे. यासंदर्भात ठोस उपाययोजना न आखल्यास तीव्र पाणीटंचाई व चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागेल, अशी प्रतिक्रिया बिरगड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. सध्या जिल्ह्यात सर्वत्रच अशी परिस्थिती दिसून येत आहे.