जनजागृतीवर भर देणार
By Admin | Updated: September 28, 2014 00:42 IST2014-09-28T00:36:40+5:302014-09-28T00:42:01+5:30
लातूर : जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे़ लोकसभा निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले़ अनेक बुथवर

जनजागृतीवर भर देणार
लातूर : जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे़ लोकसभा निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले़ अनेक बुथवर ५० टक्केपेक्षा कमी मतदान झाल्याने आता प्रशासनाकडून अशा बुथवर मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत़ विधानसभा निवडणुकीत किमान ८० टक्के मतदान होईल, असे उद्द्ष्टि असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले़
शाळा- महाविद्यालयाच्या माध्यमातून जनजागरण केले जाणार आहे़ तसेच महिला बचत गटांचा मेळावा, शाळांमध्ये पालक मेळावा, निबंध स्पर्धा, सर्वाधिक मतदान झालेल्या बुथवरील मतदान केंद्र अधिकाऱ्यांचा गौरव आदी उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पोले म्हणाले़ लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावायला हवा़ ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मतदानाची टक्केवारी कमी आहे़
शहरी भागात सुशिक्षित मतदार असले ते बऱ्याचदा घराबाहेर पडत नाहीत़ त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यात माहितीपत्रकाचे वाटप केले जाणार आहे़ लातूर शहरात मागील निवडणुकीत जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले आहे, लातूर शहर व उदगीर तालुक्यात मतदानाचे एकूण प्रमाण वाढायला हवे, यासाठी जनजागरण करण्यात येणार आहे़ तशी तयारी प्रशासनाकडून करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी पोले यांनी सांगितले़ जिल्हा पुरवठा अधिकारी अनंत गव्हाणे यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)