माजलगाव धरण परिसरात तरसाचा वावर

By Admin | Updated: June 26, 2017 00:36 IST2017-06-26T00:33:51+5:302017-06-26T00:36:13+5:30

माजलगाव : शहरास लागून असलेल्या माजलगाव धरणाच्या परिसरातील देवखेडा शिवारात दोन दिवसांपासून तरसाचा वावर होत आहे

Flurries in the Majalgaon dam area | माजलगाव धरण परिसरात तरसाचा वावर

माजलगाव धरण परिसरात तरसाचा वावर

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहरास लागून असलेल्या माजलगाव धरणाच्या परिसरातील देवखेडा शिवारात दोन दिवसांपासून तरसाचा वावर होत आहे. अरु ण जोगडे व सुभाष जोगडे यांच्या शेतात प्रत्यक्षात पाहिल्याने या परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. वन विभागाच्या पथकाने उमटलेल्या पायाचे ठसे घेतले असून त्यांनी तरसच असल्याची खात्री केली. वनविभागाचा पिंजरा लातूरला पाठविला असल्याने तो येण्यास विलंब लागणार आहे.
मागील आठ दिवसांपूर्वी याच परिसरातील ढोरगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेतात बिबट्या दिसला होता. आता पुन्हा एकदा तरस पाहिल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही शेतकऱ्यांनी पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. तसेच तहसीलदार एन.जी.झंपलवाड यांना माहिती मिळाल्यावर त्यांनीही धारूर येथील वनविभागाच्या कार्यालयाला कळवले. वन अधिकारी मुंडे हे पथकासह या परिसरात दाखल झाले. त्यांनी पायांचे ठसे घेतले. त्यावेळी त्यांनी हे तरस असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, वनविभागाचा पिंजरा लातूर जिल्ह्यात असल्याने तो आणण्यासाठी कर्मचारी रवाना झाले आहेत. तरसाचा बंदोबस्त तात्काळ करण्याची मागणी देवखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Flurries in the Majalgaon dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.