विद्यार्थ्यांनी तयार केले पक्ष्यांसाठी पाणवटे
By Admin | Updated: May 13, 2014 01:15 IST2014-05-12T23:18:15+5:302014-05-13T01:15:03+5:30
अंबाजोगाई:सध्या कडक ऊन पडत असल्याने पक्ष्यांना अन्न पाणी मिळावे. यासाठी बौद्ध धम्म संस्कार केंद्राच्या विद्यार्थ्यांनी पाणवटे व धान्य यांची सोय केली आहे.

विद्यार्थ्यांनी तयार केले पक्ष्यांसाठी पाणवटे
अंबाजोगाई:सध्या कडक ऊन पडत असल्याने पक्ष्यांना अन्न पाणी मिळावे. यासाठी बौद्ध धम्म संस्कार केंद्राच्या विद्यार्थ्यांनी पाणवटे व धान्य यांची सोय केली आहे. या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील बोधीवृक्षावर तसेच परिसरातील, अंगणातील झाडांना विद्यार्थ्यांनी पाण्यासाठी विविध प्रकारच्या छोट्या कुंड्या, तसेच धान्यासाठी वेगवेगळे पात्र तयार करून टांगले आहेत. त्यात विद्यार्थी नित्यनियमाने पाणी व धान्य टाकतात. घरातील विविध टाकाऊ वस्तूंपासून पाण्याच्या कुंड्या, तसेच धान्यासाठी टांगणीचे पात्र तयार करण्यात आले. या कार्यशाळेत पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी अॅड. संदीप थोरात यांनी तथागत बुद्धांचे पक्षी प्रेम या विषयावर विद्यार्थ्यांनी विविध कथा सांगितला. पक्षांचे पर्यावरणातील स्थान व मानवी जीवनाला होणारी मदत यावर सविस्तर मार्गदर्शन केले. पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यासाठी पहाग सोनवणे, सुशांत ओगले, तुषार जोगदंड, बुद्धभूषण सरवदे, प्रतीक तरकसे, तन्मय साळवे, उज्ज्वल वडमारे, राज गायकवाड, प्रतीक सरवदे, कनिष्क ओगले, अस्मिता बनसोडे, श्रेया कसबे, वैष्णवी ओगले, ऋतिका वेडे, विदिशा लोणारे, मयुरी कांबळे, श्रेया सरवदे, पूर्वा तरकसे, अजिंक्य शिंदे आदींनी पुढाकार घेतला. पक्ष्यांसाठी विद्यार्थ्यांनी झाडांवर पाणी व धान्य असलेल्या कुंड्या टांगल्याने परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे चेहरेही फुलले आहेत. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्कार केंद्राचे अॅड. संदीप थोरात, प्रा. कीर्तिराज लोणारे, विवेक घोबाळे, बाळासाहेब खांडके, दीपक गायकवाड, सुहास सरवदे आदींनी विशेष परिश्रम घेतले. किलबिलाटही वाढला ज्याठिकाणी पक्ष्यांसाठी झाडाला लटकवलेले पाणवठे आणि केलेली धान्याची सोय यामुळे या परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट, चिवचिवाट वाढलेला दिसून येत आहे. परिसरात पक्षी येत असल्याने परिसर प्रसन्न होत आहे. विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात या पक्ष्यांची काळजी घेण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (वार्ताहर)