पाच हजार ब्रास गाळ काढला
By Admin | Updated: May 13, 2014 01:10 IST2014-05-12T23:57:43+5:302014-05-13T01:10:44+5:30
कळमनुरी : तालुक्यातील घोळवा या तलावातील आतापर्यंत लोकसहभागातून ५ हजार ब्रास गाळ काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते यांनी दिली.

पाच हजार ब्रास गाळ काढला
कळमनुरी : तालुक्यातील घोळवा या तलावातील आतापर्यंत लोकसहभागातून ५ हजार ब्रास गाळ काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते यांनी दिली. लोकसहभाग व शेतकरी स्वयंस्फुर्तीने ट्रॅक्टरने गाळ काढून शेतात टाकण्यासाठी नेत आहेत. अजूनही ८ हजार ब्रास गाळ काढण्यात येणार आहे. या गाळाचा १०० एकर शेतीला फायदा होणार आहे. शेती सुपीक होवून उत्पन्नात वाढ होणार आहे. ५० हून शेतकर्यांना या गाळाचा फायदा होत आहे. तसेच तालुक्यातील पेठवडगाव येथील तलावातील एक हजार ब्रास गाळ काढण्यात आला आहे. तालुक्यातील सर्वच तलावातील गाळ काढण्याची मोहिम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी तहसील कार्यालयाचे के.एम. वीरकुंवर, ए.एम. सुळे, पी.पी.पतंगे, सोवितकर आदी प्रयत्न करीत आहेत. (वार्ताहर)