‘ते’ पाच जण चौकशीसाठी आलेच नाही
By Admin | Updated: March 18, 2017 23:48 IST2017-03-18T23:47:09+5:302017-03-18T23:48:42+5:30
जालना : महाराष्ट्र बँकेची फसवणूक केलेल्या २४ पैकी पाच आरोपींची शनिवारी पोलीस चौकशी होणार होती.परंतु ते चौकशीसाठी आले नाहीत.

‘ते’ पाच जण चौकशीसाठी आलेच नाही
जालना : येथील महाराष्ट्र बँकेची यूपीआय अॅपद्वारे २४ संशयितांनी ९६ लाख ४९ हजार ५६३ रूपयांची फसवणूक केलेल्या २४ पैकी पाच संशयीत आरोपींची शनिवारी पोलीस चौकशी होणार होती. परंतु पाचही जण चौकशीस आले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र बँकेच्या ११ शाखांमधून अॅपव्दारे खात्यातून पैसे दुसऱ्या बँक खात्यात वळते केल्याने बँकेला तब्बल ९६ लाख ४९ हजार ५६३ रूपयांची फसवणूक झाल्याची तक्रार शाखाधिकारी संदीप कदम यांनी बुधवारी सदर बाजार पोलिसात दिली. पाच जण हे सदर बजार पोलीस हद्दीतील असल्याने त्यांना शनिवारी पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी चौकशीसाठी बोलावले होते. परंतु ते चौकशीसाठी आले नाहीत.