परळीच्या नगराध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: November 16, 2014 00:37 IST2014-11-16T00:14:20+5:302014-11-16T00:37:55+5:30
अंबाजोगाई : परळी येथील नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह पाचजणांविरूद्ध शनिवारी येथील शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला

परळीच्या नगराध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा दाखल
अंबाजोगाई : परळी येथील नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह पाचजणांविरूद्ध शनिवारी येथील शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. जमिनीचे खोटे दस्ताऐवज तयार केल्याचे हे प्रकरण आहे.
बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह त्यांचे बंधू हरिहर, प्रताप तसेच आशुतोष आनंद बडवे, अनिल गोपीनाथ बडवे (सर्व रा. परळी) यांचा आरोपीत समावेश आहे. परळीचे माजी उपनगराध्यक्ष माणिकराव बाजीराव धर्माधिकारी यांच्या निधनानंतर त्यांचे नातू व मुलांमध्ये परळी शिवारातील सर्व्हे नं. ६० मधील जमिनीच्या मिळकतीचा वाद आहे. ९ एकर ३३ गुंठे जमिनीची तडजोड रमेश माणिकराव धर्माधिकारी, सुरेश माणिकराव धर्माधिकारी, चंद्रशेखर माणिकराव धर्माधिकारी यांना विश्वासात न घेता केली. त्यासाठी १८ डिसेंबर २०१३ रोजी बनावट दस्ताऐवज बनविल्याचा या पाच जणांवर आरोप आहे.
या प्रकरणी रमेश धर्माधिकारी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशावरून अंबाजोगाई शहर ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. सहायक निरीक्षक बी.डी. बोरसे हे तपास करीत आहेत. (वार्ताहर)