वळदगावातून पाच जनावरे लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 20:30 IST2019-06-22T20:29:55+5:302019-06-22T20:30:05+5:30
वळदगावात गोठ्यात बांधलेली पाच जनावरे चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

वळदगावातून पाच जनावरे लांबविली
वाळूज महानगर : वळदगावात गोठ्यात बांधलेली पाच जनावरे चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पशु पालकाने सातारा पोलिस ठाण्यात चोरट्याविरुध्द तक्रार दिली आहे.
वळदगाव येथील विष्णू राधाकिसन झळके यांनी गट नंबर ५० शेती असून, दुधाचा व्यवसाय आहे. शेतातील गोठ्यात शुक्रवारी सांयकाळी ७ वाजता गायीचे दुध काढल्यानंतर जनावराना चारा-पाणी करुन झळके गावातील घरी गेले.
दरम्यान, शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास झळके हे दुध काढण्यासाठी शेतात गेले असता त्यांना दोन गायी, दोन कालवडी व एक गोऱ्या गोठ्यात दिसून आल्या नाहीत. पाचही जनावरे गायब झाल्यामुळे झळके यांनी कुटुंबियासह परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र ही जनावरे कुठेही मिळून आली आहे. विष्णू झळके यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.