गावठी पिस्तुलासह पाच आरोपी अटकेत
By Admin | Updated: December 12, 2014 00:52 IST2014-12-12T00:39:00+5:302014-12-12T00:52:30+5:30
जालना : अहमदनगर जिल्ह्यातून गावठी पिस्तुल विक्रीसाठी जालन्यात घेऊन आलेल्या इसमासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक करून सदरपिस्तुल जप्त केला आहे.

गावठी पिस्तुलासह पाच आरोपी अटकेत
जालना : अहमदनगर जिल्ह्यातून गावठी पिस्तुल विक्रीसाठी जालन्यात घेऊन आलेल्या इसमासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक करून सदरपिस्तुल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, बदनापूर येथील हॉटेल एकांतचे पाठिमागील बाजूस नेवासा जि. अहमदनगर येथील दोन इसम हे गावठी बनावट पिस्टल घेऊन जालना येथील नसीर शेख रा. माळीपुरा यांना विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पो. नि. कुलकर्णी व सपोनि विनोद इज्जपवार यांनी त्यांचे स्टाफसह बातमीच्या ठिकाणी सापळा रचून बसले.
सायंकाळी ६.१० वाजता सदरील ठिकाणी दोन इसम एका विना नंबरच्या मोटारसायकलवर त्या ठिकाणी येऊन थांबले.
थोड्या वेळातच त्यांचेजवळ एक इसम येऊन ते एका ठिकाणी बसून काही तरी व्यवहार करत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना घेराव घालून जागीच ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात एक गावठी बनावट पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे, मोबाईल व एक मोटारसायकल असा एकूण १ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पुढील तपास सपोनि विनोद इज्जपवार, विशेष कृती दल जालना हे करत आहेत.
आरोपींची नावे अशी : शेख अलीम शेख साहेब मियाँ (वय २०, रा. नॅशनल नगर, जालना), अमजद हनीफ पटेल (वय २१, रा. अहिल्यानगर, नेवासा), इम्रान इलियास शेख (वय २१, रा. नाईकपुरा, नेवासा).
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सपोनि विनोद इज्जपवार, विशेष कृती दलाचे अर्जुन पवार, स्कॉट, हजारे, धनाजी कावळे, अंबादास साबळे, साईनाथ पवार, गजू भोसले, शिवलकर, चिंचोले, देठे व जाफराबाद पोलिस ठाण्याचे पोकॉ दीपक पाटील, घनसावंगी ठाण्याचे पोकॉ सचिन चौधरी यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)