गुटखा प्रकरणातील पाच आरोपींचा शोध सुरूच!
By Admin | Updated: August 19, 2016 00:57 IST2016-08-19T00:36:42+5:302016-08-19T00:57:04+5:30
जालना : गुटखा साठा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघांनीही दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी उर्वरित फरार संशयीत आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

गुटखा प्रकरणातील पाच आरोपींचा शोध सुरूच!
जालना : गुटखा साठा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघांनीही दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी उर्वरित फरार संशयीत आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
बदनापूर तालुक्यातील खादगाव शिवारातील सूर्या रिसॉर्टमधून अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या औरंगाबाद येथील पथकाने २९ जुलै रोजी गुटखा साठा व साहित्य जप्त केले होते. या प्रकरणाला बावीस दिवस उलटून गेले तरी अद्याप पोलिस मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचू शकलेले नाहीत. या प्रकरणातील पकडण्यात आलेले आरोपी दिपक दास, माजी नगरसेवक फेरोज तांबोळी आणि जगदीश खट्टर यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिस विविध ठिकाणी छापे मारत आहेत. परंतु या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांना हुलकावणी देत असल्याचे चित्र आहे. या प्रकरणात पाच जणांची नावे पुढे आली असून, त्यांच्या शोधार्थ पोलिस असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होऊन सर्व आरोपींना अटक कधी होणार हा प्रश्न कायम आहे. (प्रतिनिधी)