शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आधी नडला आता पोलिसांसमोर गुडघ्यावर; कुणाल बाकलीवालला मुजोरी भोवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:29 IST

दोन तासात सस्पेंड करतो, अशी धमकी देत वरिष्ठांना कॉल लावून देत पोलिसांनाच सुनावले.

छत्रपती संभाजीनगर : अर्वाच्च शिवीगाळ करून पोलिसांना कस्पटासमान लेखणाऱ्या कुणाल दिलीप बाकलीवाल (३८, रा. बीड बायपास परिसर) याच्या पोलिसांनी रविवारी मुसक्या आवळल्या. सायंकाळी ४:०० वाजता त्याला घरातून त्याला अटक केली. शिवाय, ज्या गाडीत बसून मुजोरी केली ती डिफेंडर कारही जप्त केली.

मिल कॉर्नर परिसरात २४ जानेवारीला सायंकाळी वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक विवेक जाधव सहकाऱ्यांसह वाहतूक नियमन करत हाेते. यावेळी बाकलीवालने व्हीआयपी सायरन वाजवत चौकाच्या मधोमध गाडी थांबवून पोलिसांना शिवीगाळ केली. दोन तासात सस्पेंड करतो, अशी धमकी देत वरिष्ठांना कॉल लावून देत पोलिसांनाच सुनावले. सुरुवातीला यात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे यांनी रविवारी यात दखलपात्र गुन्हा दाखल करून अटकेचे आदेश दिले. बाकलीवालच्या पोलिसांसोबतच्या उद्दामपणाचा पोलिसांनी रेकॉर्ड केलेला २ मिनिटे ३३ सेकंदांचा व्हिडीओ रविवारी राज्यभरात व्हायरल झाला. सोशल मीडियावरही नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

घरातून ताब्यात, हात जोडून माफीआदेश प्राप्त होताच पोलिसांनी बीड बायपासवरील घरातून त्याच्या मुसक्या आवळून क्रांती चौक ठाण्याच्या कोठडीत टाकले. उपायुक्त बगाटे यांच्या समोर हजर केल्यावर त्याने उद्दामपणाबाबत हात जोडून माफी मागितली. त्याच्याकडील गाडी (एमएच २० जीके १८१९) ही भावेन आमिनच्या नावावर आहे.

मान खाली घालून उभाबाकलीवालला सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले. लंगडत न्यायालयात आलेला बाकलीवाल मान खाली घालून उभा होता. ॲड. आमेर काझी यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडली. ॲड. गोपाळ पांडे यांनी बाकलीवालच्या वतीने बाजू मांडली. पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त करणे, गाडीची माहिती घेण्याच्या मुद्द्यांवर पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपी पक्षाने मात्र गाडीची कागदपत्रे तत्काळ सादर केली. शिवाय, मोबाइल पोलिसांना सुपूर्द करण्याचे आश्वासन दिले. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर केला.

...या कलमान्वये गुन्हासहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून बीएनएस १३२ (सरकारी कामात हस्तक्षेप), ३५१ (२), ३५२ (धाकपटशाही करणे व करण्याबाबत शिक्षा) सह मोटरवाहन अधिनियम १०० (२), ११९(२), १७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सहायक आयुक्तांकडून त्याच्यावर आता प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर