शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

कळंबमध्ये जिल्ह्यातील पहिले इनडोअर स्टेडिअम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2017 12:40 AM

कळंब : शिक्षणक्षेत्रात नावाजलेल्या कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या डिकसळ कॅम्पसमध्ये जिल्ह्यात पहिलेच इनडोअर स्टेडीयम महाविद्यालयाने साकारले

कळंब : शिक्षणक्षेत्रात नावाजलेल्या कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या डिकसळ कॅम्पसमध्ये जिल्ह्यात पहिलेच इनडोअर स्टेडीयम महाविद्यालयाने साकारले असून, त्यासाठी एक कोटी २९ लक्ष रूपये खर्च आला आहे़ यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे़ येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचा हावरगाव रोड व ढोकी रोडवरील डिकसळ परिसरात मोठा कॅम्पस आहे. डॉ़ अशोकराव मोहेकर यांच्या संकल्पनेतून आजवर महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत़ महाविद्यालयातील खेळाडुंनी राज्यासह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये नवलौकिक मिळविला आहे़ या खेळाडुंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा सुविध मिळाव्यात व याद्वारे क्रिडा विकास साधावा या उद्देशाने प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर यांनी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाकडे इनडोअर स्टेडियमचा प्रस्ताव सादर केला होता. यास विद्यापीठ अनुदान आयोगाने २०११ साली मंजूरी देवून ७० लाखाचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर काही काळातच या स्टेडियमची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजूर केलेल्या इनडोअर स्टेडियमची उभारणी आपल्या डिकसळ भागातील विस्तिर्ण कॅम्पसमध्ये करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तांत्रिकदृष्ट्या अभ्यासू व्यक्तिकडून याचा आराखडा तयार करुन घेतला. यानुसार तयार झालेले इनडोअर स्टेडीअम हे तब्बल १५०० स्क्वेअर मीटर एवढे विस्तिर्ण आहे़ यात खेळाडू निवासासाठी १८ स्वतंत्र कक्ष आहेत. या स्टेडियममध्ये बॅडमिटन, ज्यूदो, बुद्धीबळ, टेबल टेनिस, बॉक्सींग, कुस्ती, खो-खो, क्वॉश आदी खेळासाठी खेळाडू उपयोग करु शकणार आहेत़ या स्टेडियमचे उद्घाटन शुक्रवारी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आ. विक्रम काळ होते. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राचे संचालक डॉ. दिपक देशमुख, क्रीडा संचालक जनक टेकाळे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकूल, सचिव प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर, डॉ.आप्पासाहेब हुंबे, प्राचार्य डॉ. सूर्यकांत जगदाळे, प्रा. श्रीकृष्ण चंदनशीव, प्रा.श्रीधर भवर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.मोहेकर यांनी या स्टेडियममुळे आंतरारष्ट्रीय सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक क्रीडा विभागप्रमुख डॉ. बी. एन. गपाट, सूत्रसंचालन डॉ. सुनील पवार यांनी तर आभार डॉ. व्ही. एस. अनिगुंठे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. सतीश लोमटे, प्रा. बोंदर, प्रा. एस. एस. वायबसे, प्रंबधक एस. एस. जाधव, अरविंद शिंदे आदींनी परिश्रम घेतले़ (वार्ताहर)