शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
2
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
3
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
4
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी;अनेकांची गेली दृष्टी,७ जणांची मृत्यूशी झुंज
5
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
6
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
7
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
8
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
9
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
10
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
11
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
12
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
13
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
14
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
15
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
16
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
17
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
18
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
19
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
20
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Daily Top 2Weekly Top 5

आधी मोबाईल जाळला, मग प्रेयसीचा जीव घेतला! भीषण हत्याकांडात प्रियकराला मरेपर्यंत कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 19:11 IST

मुकुंदवाडीतील त्या भीषण हत्याकांडाचा निकाल; दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या संशयावरून केला होता खून

छत्रपती संभाजीनगर : दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या संशयावरून प्रेयसीचा गळा आवळून खून करणारा प्रियकर तथा आरोपी भोलाकुमार कुंजल मास्टर कुमार (२८, रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश ह.मु. स्वराजनगर, मुकुंदवाडी) याला सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी सोमवारी (दि.१९ जानेवारी) जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड ठोठावला.

घटनेची पार्श्वभूमीराहुल बरखू राय (२०, रा. मुकुंदवाडी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुल कुटुंबासह मुकुंदवाडीतील स्वराजनगर येथे राहतो. आरोपी भोलाकुमार देखील त्यांच्यासोबत राहत होता. घटनेतील मृत महिला आणि भोलाकुमार यांचे प्रेमप्रकरण होते. परंतु सदर महिलेचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा भोलाकुमारला संशय होता. यावरून महिला व भोलाकुमार यांच्यात वाद झाला होता. वादानंतर भोलाकुमारने तिचा मोबाइल जाळला होता. या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागताच राहुलचा मोठा भाऊ सुनील याने भोलाकुमार याला दुसरीकडे रुम बघण्यास सांगितले होते. त्यानुसार भोलाकुमार स्वराजनगर येथे किरायाने राहण्यासाठी गेला होता.

प्रेयसीने सोडल्याच्या रागातून खूनप्रेयसीने आपल्याला सोडल्याचा राग भोलाकुमारच्या मनात होता. त्याने ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रेयसीला मारहाण केली. त्यानंतर ओढणीने गळा आवळून तिचा खून केला व मृतदेह गुंडाळून मैदानात आणून टाकला. सदर महिला घरी आली नाही म्हणून आरोपी फिर्यादीसोबत तिला शोधण्यासाठी फिरला. दुसऱ्या दिवशी पहाटे दूध घेऊन जात असलेल्या महिलेला तिचा मृतदेह आढळला होता. याबाबत मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खटल्याची सुनावणी व शिक्षाखटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकअभियोक्ता अरविंद बागुल यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यातील ३ जणांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने भादंवि कलम ३०२ अन्वये आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त ३ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागेल, असे आदेशात म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jealous Lover Kills Girlfriend After Burning Phone; Gets Life Sentence.

Web Summary : A jelaous man in Chhatrapati Sambhajinagar murdered his girlfriend suspecting infidelity. He first burned her phone, then strangled her. The court sentenced him to life imprisonment and a fine of ₹10,000 for the brutal crime.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर