पहिले हमामगृह दौलताबादेत

By Admin | Updated: July 27, 2014 01:18 IST2014-07-27T01:07:22+5:302014-07-27T01:18:33+5:30

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद प्राचीन भारतात इ.स. ३,००० वर्षांपूर्वी मोहोंजोदारो येथे सार्वजनिक स्नानगृहे होती, असे खोदकामात आढळून आले. तेथील हमामखाने (स्नानगृहे) म्हणजे थंड पाण्याचे कुंड.

First Hammam Daulatbate | पहिले हमामगृह दौलताबादेत

पहिले हमामगृह दौलताबादेत

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद
प्राचीन भारतात इ.स. ३,००० वर्षांपूर्वी मोहोंजोदारो येथे सार्वजनिक स्नानगृहे होती, असे खोदकामात आढळून आले. तेथील हमामखाने (स्नानगृहे) म्हणजे थंड पाण्याचे कुंड. हे कुंड स्नानासाठी वापरले जात असत. देशातील पहिला हमामखाना ६५० वर्षांपूर्वी दौलताबाद येथे उभारण्यात आला होता, असा दावा इतिहास संशोधक डॉ. रमजान शेख यांनी केला आहे.
६५० वर्षांपूर्वी दौलताबादेत ‘बाष्प स्नानगृहे’ होती. त्यातील तीन हमामखाने आजही टिकून आहेत. देवगिरी किल्ल्यात जनाना हमाम व मर्दाना हमाम आहेत. तिसरा हमाम किल्ल्याबाहेर आहे. अशी स्नानगृहे औरंगाबाद, बीदर, हैदराबाद, विजापूर आदी ठिकाणी बांधण्यात आली.
हमाम म्हणजे स्नानगृह. मध्ययुगीन हमामला टर्किश बाथ म्हणत. महंमद तुघलकाने १४ व्या शतकात बाष्प स्नानगृहाची पद्धत दौलताबादेत सुरू केली.
१४ व्या शतकात आलेल्या इब्न बनुता नावाच्या प्रवाशाने या हमामचे सुंदर वर्णन लिहून ठेवले आहे.

Web Title: First Hammam Daulatbate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.