पहिली ई-रिक्षा औरंगाबादेतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:21 IST2017-10-16T01:21:29+5:302017-10-16T01:21:29+5:30
१७ आॅक्टोबर रोजी मराठवाड्यातील पहिल्या ई-रिक्षाला हिरवी झेंडी दाखविण्यात येईल.

पहिली ई-रिक्षा औरंगाबादेतून
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी, पेट्रोल-डिझेलचा वापर टाळण्यासाठी आणि शहरवासीयांना स्वस्तात वाहतूक सुविधा मिळवून देण्यासाठी विजेवर चालणाºया ई-रिक्षा आता औरंगाबादमध्ये धावणार आहेत. १७ आॅक्टोबर रोजी मराठवाड्यातील पहिल्या ई-रिक्षाला हिरवी झेंडी दाखविण्यात येईल.
मंगळवारी सकाळी १० वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे ई-रिक्षाला हिरवी झेंडी दाखवणार आहेत. या कार्यक्रमाला खा. चंद्रकांत खैरे, महापौर बापु घडमोडे, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब, डॉ. भागवत कराड, संजय केणेकर, माजी आ. प्रदीप जैस्वाल, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांची प्रमुख उपस्थिती राहील.