शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

आधी मुलाला कोंडले,नंतर बायकोवर वार केला; तिची तडफड पाहून स्वतःला संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 12:40 PM

Crime in Aurangabad : मुलाच्या खोलीला लावली बाहेरून कडी

ठळक मुद्देपतीने क्षुल्लक वादातून पत्नीचा खून केला पत्नीला तडफडत सोडून पतीची आत्महत्या

औरंगाबाद/ दौलताबाद : क्षुल्लक वादातून कुऱ्हाडीचा तुंबा डोक्यात घालून पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना टाकळीचीवाडी येथे शनिवारी (दि.१७) रात्री २ वाजेच्या सुमारास घडली. गंगूबाई चंपालाल बिघोत (वय ४८) आणि चंपालाल तानासिंग बिघोत (५५) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.

दौलताबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळीचीवाडी (ता. गंगापूर) येथील गट नंबर ९ मधील शेतात चंपालाल बिघोत एका मुलासह राहतात. त्यांचा एक मुलगा मुंबईतील पोलीस दलात आहे. दुसरा मुलगा त्यांच्यासोबत राहून शिक्षण घेतो. एका मुलीचा विवाह झालेला आहे. शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर हे कुटुंब झोपी गेले होते. मध्यरात्रीनंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. यामुळे संतप्त पती चंपालालने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा तुंबा घातला. तत्पूर्वी, त्याने मुलगा झोपलेल्या खोलीचा दरवाजा बाहेरुन लावला होता. पत्नी गंभीर जखमी झाल्याचे पाहून पतीने तेथून पळ काढला. आईच्या रडण्याचा आवाजामुळे मुलाला जाग आली. त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता, दरवाजा बाहेरुन बंद होता. त्याने आरडाओरड केली. या आवाजाने घराजवळच राहणारे मुलाचे दोन मामा धावत आले. त्यांनी मुलाच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंगूबाई यांना वाहनातून सुरुवातीला वेरुळ येथील रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर प्रकृती गंभीर असल्यामुळे औरंगाबादेत नेण्याचा सल्ला दिला. रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास गंगूबाई यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेची माहिती सकाळी ६ वाजता गावच्या पोलीसपाटलांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. दौलताबाद ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच पोलीस उपायुक्त वनिता वनकर, सहायक आयुक्त विवेक सराफ यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घाटी रुग्णालयात दोन्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून रात्री उशिरा गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

विहिरीवर रक्ताने माखलेली कुऱ्हाड सापडलीगंगूबाई यांच्या मृत्यूनंतर चंपालाल यांचा शोध घेण्यास सकाळी सुरुवात केली. तेव्हा घराच्या जवळील विहिरीच्या काठावर रक्ताने माखलेली, त्याला महिलेचे केस लागलेली एक कुऱ्हाड आढळली, तसेच रक्ताने माखलेले कपडेही सापडले. चंपालालची चप्पलही तेथे आढळली. त्यामुळे त्याने विहिरीत आत्महत्या केल्याचा अंदाज आला. विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी औरंगाबाद येथून अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. जवानांनी १५ मिनिटांत विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. त्यावरून पत्नीची हत्या करुन चंपालाल यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर अधिकृतपणे खुनाची आणि आत्महत्येची तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती गावच्या पोलीसपाटलांनी दिली.

Dr. Rajan Shinde Murder : डोक्यात घातलेले डंबेल, रक्त पुसलेले टॉवेल विहिरीत सापडले, चाकूचा शोध सुरु 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद