शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जनरेशन बीटाच्या पहिल्या बाळाचे नवीन वर्षाच्या ४९ व्या मिनिटाला आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 18:52 IST

सुपर! नव्या वर्षात अनेकांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन

छत्रपती संभाजीनगर : स्थळ : घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागाची ओ.टी. वेळ मंगळवारी मध्यरात्रीची. बाहेर नातेवाईक नव्या पाहुण्याची वाट पाहत बसलेले कुटुंबीय. आतून आवाज दिला जातो आणि कुटुंबीय धावतच जातात. डाॅक्टर सांगतात, ‘मुलगा झाला... शुभेच्छा’. कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नाही. जन्माची वेळ रात्री १२:४९ वाजेची. २०२५ मध्ये जन्मलेले घाटीतील पहिले बाळ. या बाळाचे आनंदात स्वागत करण्यात आले.

घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात मध्यरात्री छाया नितीन पवार (रा. गांधीनगर) यांच्या सिझेरियन प्रसूतीला सुरुवात झाली. बाहेर कुटुंबीय बसून होते. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनाची प्रतीक्षा होती. रात्री १२:४९ वाजता सिझेरियन प्रसूती झाली आणि मुलगा झाला. बाहेर वाट पाहत बसलेले बाळाचे वडील नितीन पवार, बाळाच्या काकू कल्पना पवार यांना डाॅक्टरांनी माहिती दिली. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. डाॅक्टरांनी सांगितले, ‘२०२५ मधील घाटीत जन्मलेले हे पहिले बाळ आहे...’. त्यांचा आनंद आणखी द्विगुणित झाला. सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघमारे यांनी बाळाचे आणि नितीन पवार यांचे गुलाबपुष्प, शाल आणि बेबीकिट देऊन स्वागत केले.

या प्रसूतीसाठी अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. श्रीनिवास गडप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. अर्शिया सय्यद, डाॅ. ऐश्वर्या परळीकर, भूलतज्ज्ञ डाॅ. कुलकर्णी, डाॅ. अपूर्वा त्रिभुवन, डाॅ. साक्षी महात्मे, डाॅ. संपदा माने, डाॅ. तेजस पाटील, डाॅ. ज्योती अंकाडे, डाॅ. हर्षदा हिरे, ब्रदर विकास रहाणे, बाबासाहेब घाडगे, परिचारिका शमीम बेग, ज्योती वाव्हळ, कर्मचारी संगीता रामफळे, मंजू गडपकर, आदींनी प्रयत्न केले.

घाटीवर विश्वासमला सहा वर्षांची मुलगी असून, तिचा जन्म घाटीत झालेला आहे. घाटीवर विश्वास असल्याने दुसरी प्रसूतीही घाटीत केली. सर्व डाॅक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.- नितीन पवार, बाळाचे वडील

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी किती बाळांचा जन्म?घाटीत दुपारी ४ वाजेपर्यंत १७ प्रसूती झाल्या. यात ९ मुले आणि ८ मुलींचा जन्म झाला, तर खासगी रुग्णालयांत सायंकाळी ६ वाजेपर्यंत २८ बाळांचा जन्म झाला, अशी माहिती स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डाॅ. ललिता बजाज यांनी दिली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNew Yearनववर्ष