शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमोपचार केंद्रे नावालाच !

By admin | Updated: October 15, 2016 01:01 IST

उस्मानाबाद : महामार्गावर ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आली आहेत़ मात्र, ही आरोग्य केंद्रेही केवळ नावालाच असल्याचे दिसून आले़

उस्मानाबाद : नवरात्रोत्सव ते अश्विनी पौर्णिमेनिमित्त तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी, यासाठी प्रशासनाच्या वतीने महामार्गावर ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आली आहेत़ मात्र, ही आरोग्य केंद्रेही केवळ नावालाच असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधींनी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले़ कुठे औषधांचा तुटवडा तर कुठे कंत्राटी कर्मचारीच भाविकांना औषध गोळ्या देताना दिसून आले़ तामलवाडीतुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सोलापूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून पायी चालत जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले आरोग्य केंद्रे हे अपुऱ्या जागेत उभारण्यात आले आहेत़ औषधांच्या तुटवड्यासह इतर मूलभूत सुविधांचा सामना करीत आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती भाविकांना मलमपट्टी करणे, औषधे देण्याचे काम करीत आहेत़तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी, माळुंब्रा, सिंदफळ, बोरी येथे प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे़ आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्या नेमणुका केल्या. शुक्रवारी बोरी प्रथमोपचार केंद्रास भेट दिली असता, एका झाडाखाली टेबल मांडून आरोग्य सेविका ज्योती कांबळे काम करताना दिसून आल्या़ झाडाला फलक लावून हे केंद्र सुरू करण्यात आले होते़ येथे जुलाबाच्या गोळ्या नव्हत्या. सिंदफळ केंद्रात आरोग्य सेविका एम.जी. मुळे, आशा कार्यकर्ती ए.के. घागरे, एन.एन. धनके या उपस्थित होत्या. येथे औषधांचा साठा उपलब्ध होता. तर माळुंब्रा शिवारात तालुका आरोग्य अधिकारी डी.एल. तेलंग यांचे पथक रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होते. माळुंब्रा येथे आरोग्य सेवक हे हॉटेल, ढाब्यावर पाणी नमुने घेण्यासाठी गेले होते. तर आशा कार्यकर्ती सविता देवकर या उपकेंद्राचा भार सांभाळत होत्या. या प्रथमोपचार केंद्रावर पॅरासिटामल या गोळ्याचा तुटवडा होता. पत्र्याच्या शेडखाली हे केंद्र चालविले जाते. वाढत्या गर्दीचा ताण प्रथमोपचार केंद्रावर पडल्याचे दिसून आले़ ग्रामपंचायतीकडून निवाऱ्याची सोयतामलवाडी येथे प्रथमोपचार केंद्रासाठी ग्रामपंचायतीने निवाऱ्याची सोय केली. तेथे आशा कार्यकर्ती सपना शिंदे, सविता रणसुरे, चंद्रकला रणसुरे या भाविकांना औषध, गोळ्या देण्याचे काम करीत होत्या. आरोग्य सेविका संगीता चव्हाण या भोजनासाठी आरोग्य केंद्रात गेल्या होत्या. याठिकाणी सायंकाळपर्यंत पुरेल एवढा औषधसाठा शिल्लक होता. आशा कार्यकर्तींच्या मदतीचा फायदा प्रथमोपचार केंद्राला होऊन त्यावरच आरोग्य सेवा देण्याचे काम सुरु आहे.