शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

व्हिडिओकॉन कंपनीच्या भंगाराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:08 AM

पैठण रस्त्यावरील चितेगाव येथील व्हिडिओकॉन उद्योग समूहाच्या रेफ्रिजरेटर विभागाच्या भंगार सामानाला सोमवारी दुपारी अचानक आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कचितेगाव : पैठण रस्त्यावरील चितेगाव येथील व्हिडिओकॉन उद्योग समूहाच्या रेफ्रिजरेटर विभागाच्या भंगार सामानाला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन जवानांना चार ते पाच तास लागले. या आगीत किती नुकसान झाले याची माहिती कंपनी व्यवस्थापनाकडून रात्री उशिरापर्यंत घेणे सुरू होते, यामुळे नुकसानीचा आकडा समजू शकला नाही.व्हिडिओकॉन कंपनीच्या आवारातील सुमारे दहा एकर जागेवर भंगार सामान ठेवण्यात आलेले आहे. या भंगाराला सोमवारी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये कंपनीचे रेफ्रिजरेटर मटेरियल, पॅकेजिंग साहित्य, पंप, पुठ्ठा, थर्माकोल, प्लास्टिक अधिक प्रमाणात होते. ही आग नजरेस पडताच कंपनीच्या तीन बंबांनी आग विझविण्यास सुरुवात केली. त्यानंतर मनपा अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. मनपा अग्निशमन दलासह, एमआयडीसी आणि बजाज कंपनीचे बंब, खाजगी १२ टँकर आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. तीन ते चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले.पाच कि.मी.पर्र्यंत धूरच धूरआगीच्या भक्ष्यस्थानी रेफ्रिजरेटरचा पंप, थर्माकोल, पुठ्ठा आणि प्लास्टिक मटेरियल आदी ज्वलनशील साहित्य असल्याने आग अधिक भडक ली. थर्माकोलमुळे धुराचे काळे लोट पाच किलोमीटरपर्यंत पसरले. धुराचे लोट दुरून नजरेस पडत असल्याने नागरिक धूर पाहून कंपनीसमोर त्यांची वाहने थांबवित आणि पुढे जात. बिडकीन पोलिसांनी कंपनीत जाऊन आगीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कंपनी कामगारांनीही आग विझविण्यासाठी धावपळ केली. सर्वत्र स्क्रॅप पसरलेले असल्यामुळे आग विझविण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्ता तयार करून अग्निशामक बंब शेवटच्या टोकापर्यंत नेण्यात आले. या घटनेतील नुकसानीचा पंचनामा केला जाईल, असे राजेंद्र बंग यांनी सांगितले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीfireआग