तामलवाडी शिवारात धावत्या टमटमला आग
By Admin | Updated: January 15, 2015 00:09 IST2015-01-14T23:50:18+5:302015-01-15T00:09:25+5:30
तामलवाडी : कागदी पुट्टे व वेफर्सचे पुडे घेवून जाणारा माल वाहतूक टमटमला अचानक पुट्टे ठेवलेल्या गठ्यांना आतून आग लागली.

तामलवाडी शिवारात धावत्या टमटमला आग
तामलवाडी : कागदी पुट्टे व वेफर्सचे पुडे घेवून जाणारा माल वाहतूक टमटमला अचानक पुट्टे ठेवलेल्या गठ्यांना आतून आग लागली. या आगीत जिवीत हानी नाही परंतु टमटमसह आतील माल जळून खाक झाल्याची घटना तुळजापूर-सोलापूर रस्त्यावरील तामलवाडी शिवारात बुधवारी सकाळी ११ वाजता घडली.
लातूर येथून टमटम (क्र. एमएच १३ आर. ७९१५) हा कागदी खोक्याचे पुट्टे व वेफर्स कुरकुऱ्यांचे पुडे घेवून तुळजापूर मार्गे सोलापूरकडे जात असताना अचानक कुलूप बंद असलेल्या टमटमच्यामागील बाजूस कागदी पुट्ट्याला आग लागली. ही आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर तामलवाडी शिवारात भारत कदम यांच्या शेताजवळ थांबवून पाहिले असता, आतून धुराचे लोट बाहेर पडत होते. तात्काळ चालकाने तामलवाडी येथील तरुणांना बोलावून घेवून आतील आग लागलेले पुट्टे बाहेर काढून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग भडकत राहिली. आगीत वेफर्स पुडे, पुट्टे जळून टमटमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अखेर आग विझविण्यासाठी टमटम शेतातील हौदावर ढकलत नेवून पाणी ओतून आग विझविण्यात आली. याकामी प्रवाशांनीही मदत केली. (वार्ताहर)